मोतीराम रहाटे, प्रतिनिधी
कन्हान (नागपुर) :- पोलीस स्टेशन अंतर्गत ५ किमी अंतरावर खदान नं ३ टी पॉइंट येथे दारू मागितल्यास दारू न दिल्याने सुरेन्द्र करपे यास आरोपी शुभम राउत ने चाकुने मारून जख्मी केल्याने कन्हान पोस्टे ला गुन्हा दाखल करून आरोपी शोध घेत आहे.
मंगळवार (दि.०३) जानेवारी २०२३ ला ४.३० वाजता दरम्यान सुरेन्द्र महादेव करपे वय ४८ वर्ष राह. खदान नं ०३ माडीबाबा ता. पारशिवनी हा खदान नं ०३ च्या टी पॉइट वर टायरच्या दुकानात बसुन मोबाईल पाहत बसला असता तिथे शुभम नेमचंद राउत हा आला आणि सुरेंद्र ला दारू मागु लागल्याने म्हटले की ” मैने दारू बेचने का काम बंद किया है ! मेरे पास दारु नही है ! ” असे बोलणे ऐकुन शुभम राउत हा सुरेंद्र शिविगाळ करून झगडा भांडण करु लागला आणि त्याचा जवळ असलेल्या एका लोंखडी चाकुने सुरेंद्च्या उजव्या हाथाच्या बोटाला मारुन जखमी करुन तिथुन पळुन गेला आणि पाहुन घेण्याची धमकी दिली. सदर प्रकरणी फिर्यादी सुरेंद्र करपे यांचे तक्रारीने पो स्टे कन्हान येथे आरोपी शुभम नेमचंद राउत विरुध्द कलम ३२४, ५०६ भादंवी कलम ४, २५ भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. कन्हान पोस्टे चे सहायक पोलीस निरीक्षक फुलझेले पुढील तपास करित आरोपीचा शोध घेत आहे.