चीनमधील भारतीय राजदूतांनी घेतली राज्यपालांची सदिच्छा भेट

मुंबई :- चीनमधील भारतीय राजदूत प्रदीप कुमार रावत यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.

भेटीदरम्यान भारत आणि चीन संबंध वृद्धींगत करणे, भाषा, तंत्रज्ञानाची देवान-घेवाण याबाबत चर्चा झाली. यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले की, भारत नव तंत्रज्ञानाचा वापर करत उद्योग क्षेत्रात प्रगती करत आहे. इज ऑफ डुईंग बिझनेसमुळे भारताने औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्या माध्यमातून आपण नवीन उद्योगधंदे भारतात आणू शकतो. आपल्या देशात कुशल कामगार असून, जागतीक पातळीवरील नव उद्योग भारतात सुरू करण्यासंदर्भात शासन सकारात्मक असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान शिकण्यासाठी विविध भाषा अवगत असणे ही आवश्यक असल्याचे सांगून, राजदूत रावत यांच्या चीनी भाषेवरील प्रभुत्वाचे राज्यपालांनी कौतुक केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नोटबंदीचा दुखवटा अजून सरला नाही; युवकांच्यावतीने आज 'नोटबंदीला श्रद्धांजली' वाहण्याचे राज्यव्यापी आंदोलन - जयंत पाटील

Tue Nov 8 , 2022
मुंबई :- आजच्या दिवशी २०१६ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी जाहीर करून देशातील स्थिर अर्थकारणाची हत्या केली. आज सहा वर्ष सरली तरी दुखवटा मात्र सरला नाही. याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस ‘नोटाबंदीला श्रद्धांजली’ वाहण्याचे राज्यव्यापी आंदोलन करणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्वीट करत दिली आहे. लोकांचे दरडोई उत्पन्न जे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com