वाळू चोरट्यावर पोलिसांची कारवाही 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कन्हान नदी पात्रातील उनगाव रेती घाटातून अवैधरित्या रेती उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची गुप्त माहिती नवीन कामठी पोलिसांना मिळताच नवीन कामठी पोलिसांनी पोलीस उपनिरीक्षक किशोर मोतींगे व सहकारी पथकाने यशस्वीरीत्या सापळा रचून उनगाव रेती घाटातून अवैध रेती उत्खनन करून उनगाव-सोनेगाव रोडने तीन ट्रॅक्टर ने चोरीची वाळू वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टर वर धाड घालण्याची यशस्वी कामगिरी आज सकाळी साडे सात वाजता केले असून या धाडीत संधी साधुन तीन आरोपीने घटनास्थळाहून पळ काढण्यात यश गाठले.तर एक आरोपी अटक आहे.या धाडीतून वाळू ने भरलेले तीन ट्रॅक्टर जप्त करीत एकूण 16 लक्ष 34 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या धाडीत चार आरोपीपैकी एक आरोपी अटक असून अटक आरोपी चे नाव अंकित अरुण नागपूरे वय 23 वर्षे रा बोरी सिंगोरी ता पारशिवणी तर पसार आरोपी मध्ये राहुल येरने वय 32 वर्षे रा बोरी सिंगोरी तसेच 30 ते 35 वयोगटातील दोन अनोळखी इसमाचा समावेश आहे.

या धाडीत घटनास्थळाहून विना नंबर प्लेट असलेले एक लाल रंगाचा ट्रॅक्टर त्यात अर्धा ब्रास रेती एकूण किमती 6 लक्ष 1 हजार रुपये,विना नंबर प्लेट असलेले एक ट्रेकटर व ट्रॉलीत असलेली 1 ब्रास रेती एकूण 5 लक्ष 2 हजार रुपये, एक आयशर कँपनीचा सिल्वर रंगाचा क्र एम एच 40 बी ई 5544 च्या ट्रॉलीत अर्धा ब्रास रेती किमती 5 लक्ष 1 हजार रुपये ,पाच मोबाईल , 12 लोखंडी फावडे,18 प्लास्टिक घमेले असा एकूण 16 लक्ष 34 हजार रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही यशस्वी कामगिरी डीसीपी निकेतन कदम, एसीपी क्षीरसागर व पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांच्या मार्गदर्शनार्थ पोलीस उपनिरीक्षक किशोर मोतींगे, अनुप अढाऊ, देवगडे, अमोल डांगरे, पवन शिरसाट,सुरज आंबूलकर,श्याम फोकमारे आदींनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अज्ञात रेल्वेगाडीच्या धडकेने अनोळखी इसमाचा मृत्यू

Thu May 2 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी कळमना रेल्वे मार्गावरील महावीर नगर ते सईद नगर रेल्वे रुळावर अज्ञात रेल्वेगाडीच्या धडकेने एका 40 ते 50 वर्षे वयोगटातील इसमाचा मृत्यु झाक्याची घटना काल सकाळी सात वाजता निदर्शनास आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेत पुढील उत्तरीय तपासणी साठी मृतदेह […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com