भाजपा द्वारे राजकीय इव्हेंट करून ‘शो बाजी’ च्या प्रचंड दबावात भारत वर्ल्ड कप क्रिकेट अंतिम सामना नाहक हरला !नरेंद्र मोदी आणि अमित शाह यानी देशाची माफी मागावी !- किशोर तिवारी, राष्ट्रीय प्रवक्ते शिवसेना (उद्धव ठाकरे)

नागपूर :- “वर्ल्ड कप क्रिकेट अंतिम सामना जाणून बुजून मुंबई ऐवजी अहमदाबाद येथे ठेवून नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये भाजपा द्वारे राजकीय भांडवल आणि इव्हेंट बनवून ‘शो बाजी’ च्या प्रचंड दबावात भारत वर्ल्ड कप क्रिकेट अंतिम सामना नाहक हरला, ही दुर्दैवी बाब आता समोर आली असून, ज्या पध्दतीने अंतिम मॅच चे ३/४ दिवस पूर्वी पासून टीव्ही चॅनल, मीडिया त्या साठी अहमदाबाद येथील क्रिकेट चे स्टेडियम वर कब्जा केला होता, अति विशिष्ट सुरक्षा यंत्रणे च्या विळख्याने आणि जणू विजय झाल्याचे श्रेय मोदींना कसे देता येईल? मीडिया ने याचा ‘मेगा शो’ कसा प्रसारित करावा ? या साठी भाजपाने २४ तास रात्रं दिवस केलेली कसरत, यामुळे भारतीय खेळाडूवर एक प्रकार चा मानसिक दबाव पडून शेवटी हा सामना आपल्या देशाने गमाविला. या साठी भाजपाचा “मेगा शो” करण्याचा अट्टाहास जबाबदार असल्याने या पराभवाची नामुष्की साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह मंत्री अमित शाह यानी देशाची माफी मागावी”, अशी मागणी शिवसेना (उद्धव ठाकरे) राष्ट्रीय प्रवक्ते किशोर तिवारी यांनी केली आहे.

अहमदाबाद येथे वर्ल्ड कप क्रिकेट अंतिम सामन्यात केवळ इव्हेंट बाजी समोर ठेवून नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये भाजपा द्वारे राजकीय भांडवल बनवून ‘शो बाजी’ साठी प्रचंड दबाव निर्माण केला गेला होता. पूर्वी विकलेल्या हजारो तिकिटा पंतप्रधान सुरक्षा कारणामुळे रद्द करून त्या भाजपा कार्यकर्त्यांना देण्यात आल्या, जेणे करून विजय कप रथ घेवून मोदी संपूर्ण स्टेडियम आणि अहमदाबाद / गांधीनगर परिसरात मिरवून त्याचे प्रसारण भाड्याच्या मीडिया लावून दिवस रात्र प्रसारित करून देशभरात ठीक ठिकाणी विजय जुलूस काढून जणू नरेन्द्र मोदी यांनीच हा वर्ल्ड कप जिंकून आणला, असा इव्हेंट आणि शो बाजी करण्याचे नादात दुसरी कडे भारतीय खेळाडूवर मनोविज्ञानिक दबाव आणि दडपण येवून त्याची परिणीती फायनल मॅच हरण्यात झाली. ज्या पद्धतीने बी.सी.सी.आय. ने खेळाडू वर दबाव निर्माण केला होता, स्टेडियम वर एकतर्फी घोळके समशान शांतता प्रस्थापित करून नकारात्मक भावना पसरवीत होते, मो. शमी आणि मो.सिराज यांना त्यांचे प्रतेक ओवर्स वर उद्देशून अर्वाच्य टोमणे मारणारे भाजपा कार्यकर्ते त्यामुळे प्रत्येक चेंडू वर खेळाडू हतबल होऊन पराजयाकडे जात होते, या सर्व वातावरणा साठी सत्तेचा माज चढलेले नेते जबाबदार असून १० सामने जिंकूनही भारतीय संघ या अनाठायी दबावामुळे शेवटी अपयशी ठरला. या साठी अवास्तव इव्हेंट बाजी आणि प्रसिद्धी साठी हपापलेले मोदी शहा हेच जबाबदार असून त्यांनी १४० कोटी भारत वासियांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी तिवारी यांनी केली आहे.

क्रिकेट च्या मैदानाचा राजकीय इव्हेंट साठी दुरुपयोग करणाऱ्या या सर्व बाबींचा उल्लेख करून खरपूस समाचार घेणार एक खुले पत्र किशोर तिवारी यांनी पंतप्रधान मोदी आणि गृह मंत्री अमित शहा यांना पाठविले असून त्यात जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे.

भारतीय क्रिकेट नियंत्रण बोर्डाने(बी.सी.सी.आय.) धोरणात्मक निर्णय घेवून भविष्यात क्रिकेट च्या मैदानाचा राजकीय इव्हेंट होण्यापासून बंदी घातली पाहिजे, अशी मागणी ही तिवारी यांनी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महारेशीम अभियानाला जिल्हयात सुरुवात, रेशीम प्रचार रथाचे उदघाटन

Fri Nov 24 , 2023
भंडारा :- शेतक-यांना रेशीम शेतीकडे वळविण्यासाठी जिल्हयात रेशीम उद्योगाचा प्रचार – प्रसारासाठी जिल्हयात रेशीम प्रचार रथ फिरणार आहे.या रेशीम प्रचार रथाला अति.जिल्हाधिकारी श्रीपती मोरे यांचे हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ् करण्यात आला.या प्रसंगी उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत पिसाळ व जिल्हा नियोजन अधिकारी शशीकुमार बोरकर उपस्थित होते. रेशीम विकास अधिकारी माधव डिगुळे वरिष्ठ तांत्रिक सहायक अनिलकुमार ढोले, वरिष्ठ क्षेत्र सहायक, बिजवे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com