सेफ अँड स्पीडी ऑटो चे उद्घाटन

नागपूर :- दक्षिण नागपुरात दुचाकी व चारचाकी वाहनांकरिता अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून सर्व सुविधा उपलब्ध असलेल्या “सेफ अँड स्पीडी ऑटो” सर्विस स्टेशन चे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते आणि आमदार मोहन मते, भाजपा शहर उपाध्यक्ष श्रीकांत आगलावे आणि उपस्थित जनसमुदायाच्या सक्रिय उपस्थितीत करण्यात आले.

सेफ अँड स्पीडी ऑटोचे संस्थापक व सर्वेसर्वा सुशांत गायधने आणि पराग मौंदेकर यांनी नितीन गडकरी यांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि गोडभेट प्रदान करीत स्वागत-सत्कार केला. आयोजनाचे प्रास्ताविक सुशांत गायधने यांनी सादर केले आणि आभार पराग मौंदेकर यांनी व्यक्त केले.

सूत्रसंचालन जवाबदारी स्वप्निल मदन समर्थ यांनी लिलया सांभाळली.

उद्घाटन सोहळा संपन्न करण्यास सर्वश्री. सौरभ गायधने, निखिल चापले, राजुभाऊ गडाधनी, राहुल मौंदेकर, रितेश मौंदेकर, जागृती गायधने, पूजा मौंदेकर यांनी श्रम घेतलेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रामधाम येथे आजपर्यंत १२६६ जोडप्यांचे निशुल्क शुभमंगल सावधान

Mon May 1 , 2023
– रामधामचा उत्सवामधून १ निशुल्क सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा – चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान रामधामचा उत्कृष्ठ उपक्रम रामटेक :- नागपुर – जबलपुर महामार्गावर असलेल्या मनसर येथील रामधाम येथे चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान रामधाम (मनसर), आधार बहुउद्देशीय संस्था नागपूर, महिला व बाल विकास विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य निशुल्क […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!