नागपूर :- मंगळवारी (ता.10) दुपारी अमरावती मार्गावरील विदर्भ हॉकी असोसिएशनच्या मैदानात हॉकी स्पर्धेचे माजी आंतरराष्ट्रीय हॉकीपटू मिर्झा सलीम बेग आणि आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू अन्वर खान यांच्या हस्ते उद्घाटन झाले. उद्घाटन समारंभाला खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी, माजी नगरसेविका डॉ. परिणिता फुके, छत्रपती पुरस्कार विजेते संजय लोखंडे, माजी नगरसेवक संजय बंगाले, महोत्सवाचे समन्वयक माजी नगरसेवक सुनील हिरणवार, माजी नगरसेवक सर्वश्री किशोर जिचकार, सुनील अग्रवाल, निशांत गांधी, नरेश बरडे, नागपूर जिल्हा हॉकी असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद ठाकरे, विनोद कन्हेरे, डॉ. विशाखा जोशी, महोत्सवाचे सचिव डॉ. पीयूष आंबुलकर, संयोजक अमित संपत आदी उपस्थित होते.
खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत हॉकी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी डॉ. ए.पी. जोशी, परवेझ कुरैशी, गुरप्रीतसिंह, हरिष कपूर, प्रमोद जैन, राजेश बिहारी, फैय्याझ कुरैशी, अनील दराल, रियाझ काझी आदी परिश्रम घेत आहेत.
निकाल :
उद्घाटनीय सामना सीनिअर पुरूष संघामध्ये कामठी युनायटेड आणि नागपूर ॲकेडमी क्लब संघामध्ये खेळविण्यात आला. यामध्ये कामठी युनायटेड संघाने दमदार कामगिरीच्या जोरावर 10-0 अशा फरकाने सामना आपल्या नावावर केला.
इतर निकाल :
सीनिअर पुरूष
1. मॉईल एलेव्हन मात नागपूर यूनायटेड क्लब (6-0)
2. इगल क्लब मात अजनी क्लब (8-0)
U-17 मुले
1. ज्ञान विद्या मंदिर मात रमेश चांडक (5-0)
सीनिअर महिला
1. रायसिंग फाउंडेशन मान एराम क्लब (1-0)
2. नागपूर ॲकेडमी क्लब मात अभिनव महिला हॉकी क्लब (2-0)