चंद्रपूर महानगरपालिका आरोग्य वर्धिनी केंद्राचे पालकमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण, मिळणार निःशुल्क आरोग्य सुविधेचा लाभ

चंद्रपूर  :- चंद्रपूर महानगरपालिकेच्या वैद्य नगर,ताडोबा रोड येथील आरोग्य वर्धिनी केंद्रांचे लोकार्पण आज दिनांक १ मे महाराष्ट्र दिन तथा कामगार दिनी सुधीर मुनगंटीवार,मंत्री,वने, सांस्कृतीक व मत्स्य व्यवसाय महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.   याप्रसंगी बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातुन आरोग्य व्यवस्था सक्षम करणे तसेच गरीब व गरजू वस्तींमध्ये आरोग्य सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने या आरोग्यवर्धिनी केंद्रांचे महत्व आहे. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असुन आरोग्य वर्धिनी केंद्र हे आरोग्य मंदिर आहे.शासन आरोग्य सेवा बळकट करण्याच्या दृष्टीने प्रयत्नरत असुन महात्मा फुले जण आरोग्य सेवेचे विमा संरक्षण हे दीड लाखांपासून ५ लक्ष पर्यंत वाढविण्यात आले आहे. आता घराजवळ आरोग्य वर्धिनी केंद्र उपलब्ध होत असल्याने आता कुणालाही आर्थीक परिस्थितीमुळे आजार अंगावर काढण्याची गरज नाही.    कॅन्सर हा दुर्धर आजार आहे,रुग्णाला मोठ्या रुग्णालयात ६-६ महिने उपचारासाठी वाट बघावी लागते. यावर उपाय म्हणुन टाटा कॅन्सर रुग्णालयासोबत एमओयु करून अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालय उभारण्यात येत आहे काही तांत्रीक अडचणींमुळे वेळ लागत असला तरी शक्य तितक्या लवकर हे रुग्णालय उभारण्यात येईल. आज बाहेर देशातील रुग्ण भारतात येऊन उपचार करतात कारण येथे स्वस्त आरोग्य सेवा त्यांना मिळते. योग दवाखान्यास दूर ठेवण्यास मदत करत असुन आज अनेक देशात योगाचा अभ्यास केला जात आहे.

कोव्हीड काळात आरोग्य सेवा कुठे कमकुवत आहे हे आपल्याला कळले. त्या दृष्टीने आज आरोग्य सेवेचे जाळे संपूर्ण देशात पसरविण्याचा शासनाचे प्रयत्न असुन आपल्या आरोग्याची काळजी आपण स्वतः घेऊन आरोग्य व्यवस्था बळकट करण्याचे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी दिव्यांग निधी व महिला कल्याण निधी अंतर्गत राष्ट्रीयकृत बँकेतर्फे मंजूर लाभार्थ्यांना कर्ज वितरण पत्र तसेच आरोग्यवर्धिनी केंद्रांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

कार्यक्रमास जिल्हाधिकारी विनय गौडा,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन,आयुक्त विपीन पालीवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.महादेव चिंचोळे,उपायुक्त अशोक गराटे,सहायक आयुक्त विद्या पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.वनिता गर्गेलवार,डॉ. मंगेश गुलवाडे,माजी उपमहापौर राहुल पावडे, माजी नगरसेवक संदीप आवारी,सुभाष कासनगोट्टूवार,अनिल फुलझेले, शिलाताई चव्हाण,रामपाल सिंग,विठ्ठलराव डुकरे,रवि गुरनुले,डॉ, नयना उत्तरवार,डॉ अश्विनी भारत तसेच मनपा वैद्यकीय अधिकारी कर्मचारी उपस्थीत होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जनावरांची अवैधरीत्या वाहतुक करणाऱ्या आरोपीताविरूद्ध कारवाई

Tue May 2 , 2023
नागपुर :- पो.स्टे. एम.आय.डी.सी. बोरी अंतर्गत काठीवाडचाच्या समोर नागपुर वर्धा रोड येथे दिनांक ३०/०४/२०२३ चे ०५.०० वा. दरम्यान एम. आय. डी. सी. बोरी पोलीसांना गुप्त माहिती मिळाली की, टाकळघाट शिवारात नागपुर वर्धा रोड ने काठीवाडी धावा समोर काही इसम विनापरवाना व अवैधरीत्या जनावरांना निर्दयतेने काबुन वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहिती वरून एम.आय.डी.सी. बोरी पोलीस पथकाने नाकाबंदी केली असता […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com