खासदार क्रीडा महोत्सव २०२२
नागपूर. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात होत असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत रविवारी (१५ मे) बेंच प्रेस पॉवरलिफ्टिंग स्पर्धेचे उद्धाटन झाले. महाल येथील हिंदू मुलींची शाळा येथे मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे यांनी यांनी फीत कापून स्पर्धेचे उद्धाटन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक संदीप जोशी होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून स्त्री प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र फडणवीस, नागपूर शहर भाजपा उपाध्यक्ष बंडू राऊत, मध्य नागपूर महामंत्री विनायक डेहनकर, विदर्भ ऑलिम्पिक असोसिएशनचे सचिव डॉ. श्रीकांत वरणकर, विदर्भ पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सचिव सचिन माथने, सामाजिक कार्यकर्ता श्रीकांत देशपांडे, विजय घाटे, डॉ़ विवेक अवसरे, सुधीर अभ्यंकर, दिनेश चावरे, अनिल गुरनुले, पराग पाठक, लक्ष्मीकांत मेश्राम, आनंद डाबरे, संदीप मोहंतो, अखिलेश पांडे, महेश सावरकर आदी उपस्थित होते.
स्पर्धेदरम्यान आमदार मोहन मते यांनी स्पर्धास्थळी भेट देऊन खेळाडूंशी संवाद साधला व त्यांना प्रोत्साहित केले.
स्पर्धेचा निकाल (अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय)
पुरूष
५९ किलो वजनगट : निलेश हिंगे (१२२.५ किलो), रुपेश नंदनवार (९० किलो), विपूल राज (८० किलो).
महिला
५२ किलो वजनगट : प्रतिमा बोंडे (७२.५ किलो), पल्लवी कायरे (५० किलो), अंशिता मनोहरे (४५ किलो).
६३ किलो वजनगट : रश्मी मनोहरे (५५ किलो), सोनिया सरोटे (४७.५ किलो), राखी वानखेडे (४७.५ किलो).