‘डोमॅस्टीक हॅपी ह्युमन इंडेक्स’ संकल्पनेत नागपूर जिल्हा पहिला!

 केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचा विश्वास

 काटोल-उमरेडमध्ये प्रचार सभेत महायुतीचे कार्यकर्ते एकवटले

 रामटेकवासीयांनी राजू पारवेंना विजयी करावे

काटोल :-शेतकऱ्यांना सुखी, समृद्ध आणि संपन्न कसे करता येणार याकरिता गेल्या दहा वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार प्रयत्न करीत आहे. आज जगात ‘डोमॅस्टीक हॅपी ह्युमन इंडेक्स’ ही संकल्पना राबविली जात आहे ज्याचा अर्थ सुखांक आहे. विकासाची जेव्हा विचारणा होते तेव्हा सुखांक असले पाहिजे. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले पिण्याचे पाणी, समृद्ध रस्ते, 24 तास विजेची उपलब्धता, गावात सुसज्ज शाळा, प्रशस्त दवाखाने याशिवाय गावात राहणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलांना रोजगार मिळाल्याच हवा. हे ‘डोमॅस्टीक हॅपी ह्युमन इंडेक्स’ संकल्पनेतून देता येते आणि ते बनविण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यात देशात ‘डोमॅस्टीक हॅपी ह्युमन इंडेक्स’ संकल्पनेचा पहिला जिल्हा नागपुर बनले, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. त्यासाठी नागपुरात मी आणि रामटकेमधून राजू पारवे यांना संसदेत जावे लागणार, असेही गडकरी म्हणाले.

काटोल तसेच उमरेड विधानसभा येथे सोमवारी महायुतीचे व शिवसेना उमेदवार राजू देवनाथ पारवे यांच्या प्रचार सभेत अध्यक्षीय भाषण नितिन गडकरी करीत होते. याप्रसंगी भाजपचे नेते चरणसिंह ठाकूर, माजी मंत्री सुबोध मोहिते, माजी आमदार आशिष देशमुख, भाजप नागपुर ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, शिवसेना जिल्हाध्यक्ष संदीप इटकेलवार, सतीश शेंडे, अॅड. निलेश हेलोंडेसह उमरेडचे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, बहुजन रिपब्लिकन एकता मंच रासपसह महायुतीच्या घटक पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकरी आत्महत्याबाबत बोलतांना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी म्हणाले की, विदर्भाचे लाछंन म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत. काटोल, नरखेड, वरूड, मोर्शीसह इतर ठिकाणी प्रगतीशील शेतकरी आहेत. त्यामुळे तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकरी आत्महत्या करणार नाही याकरिता महायुती सरकार प्रयत्न करीत असल्याचेही ते म्हणाले. मंत्री म्हणून काम करताना मी महाराष्ट्राला 5 लाख कोटी दिले. यात काटोल विधानसभा क्षेत्रातील दोन व चार पदरी रस्त्यांची कामांचा समावेश आहे. आज काटोलमध्ये संत्राकडे सर्वांचे लक्ष्य आहे. आपला संत्रा एक्सपोर्ट कसा होणार. त्याकरिता आपण मुंबईचा समुद्रच आपण जिल्हयात आणला. म्हणजेच सिंधीमध्ये आपण ड्रायपोर्ट तयार केला. यापूर्वी आपले संत्रा जेएमपीटीला कंटेनरद्वारे संत्रा पोहचवा लागत होते. यानंतर पुढे हा संत्रा परदेशात पाठविण्यात येत होता. आता आपल्या जिल्हयातच ड्रायपोर्ट तयार झाल्याने शेतकऱ्यांचा संत्रा, कापूस, कडधान्ये निर्यात करण्याचा खर्च कमी झाले आहे, असेही नितिन गडकरी यावेळी म्हणाले.

 मोदी सरकारने दिला प्रत्येकांना न्याय

गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने प्रत्येकांना न्याय देण्याचे काम केले. त्यांनी गोरगरिबांसाठी अनेक योजना त्यांनी सुरू केल्या. उज्वला गॅस, पीएम किसान योजना, मोफत रेशन यासह अनेक योजना राबवल्या. विकसित भारताचं स्वप्न पंतप्रधान मोदी यांनी साकार करून दाखवलंय. मोदी सरकारच्या काळात समाजातील प्रत्येक घटकाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न झाले.

शेतकरी असो किंवा महिलावर्ग तरुण असोत किंवा कष्टकरी मजूर, प्रत्येक वर्गासाठी योजना आखून त्याची यशस्वी अंमलबजावणी झाली. म्हणून देशात पुन्हा महायुतीचे सरकार येणे का आवश्यक आहे, असेही केंद्रीय मंत्री नितिन गडकरी म्हणाले. रामटेक लोकसभा निवडणूकीत महायुतीने शिवसेनेच्या राजू पारवे यांना उमेदवारी दिली आहे. येणाऱ्या 19 एप्रिल 2024 रोजी सर्व मतदारांनी राजू पारवे यांच्या धनुष्य बाण चिन्हाला मत देण्याचे आवाहनही केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी केले.

 विकासाकरिता ‘धनुष्य-बाणा’ला साथ : राजू पारवे

पंतप्रधान नरेंद्र मोंदींच्या नेतृत्वात महायुती येणाऱ्या लोकसभा निवडणूकीत 400 हून अधिक जागा जिंकणार असून त्यातील रामटेकच्या जागेचा त्यात समावेश आहे. उमरेड विधानसभा क्षेत्रात आमदार राहून मी गेली साडेचार वर्ष जे विकास केले आहे ते आपल्या सर्वांना माहिती आहे. महायुतीने माझ्यावर अत्यंत विश्वास टाकून मला रामटेक लोकसभा निवडणूकीचा उमेदवार बनण्याची संधी दिली आता त्या संधीला सोन करण्याची वेळ आली आहे. आता मला रामटेकच्या सहाही विधासभा क्षेत्राचा विकास करायचा आहे, असेही राजू पारवे यावेळी म्हणाले.

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी हे मंत्री असतांना त्यांनी माझ्या क्षेत्राच्या विकासासाठी दोन हजार कोटींचा निधी दिला. रामटेकमधून शिवसेनेचा विजयानंतर केंद्र व राज्य सरकारकडून जास्तीत जास्त निधी खेचून आणावा लागणार. आपल्या रामटेकच्या विकासाकरिता ‘धनुष्य-बाणा’ला साथ देण्याचे आवाहन राजू पारवे यावेळी म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सर्वाधिक मतदान करणाऱ्या सोसायटींना मिळणार पुरस्कार

Tue Apr 16 , 2024
मनपा व जिल्हा निवडणूक कार्यालयाची अभिनव स्पर्धा नागपूर :- यंदाच्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्वाधिक मतदान करणा-या सोसायटींना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. नागपूर महानगरपालिका आणि नागपूर जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने सोसायटींसाठी विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने सोमवारी (ता.१५) कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये रहिवासी सोसायटींच्या प्रतिनिधींनी मतदानाची शपथ घेतली.https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 याप्रसंगी मनपाच्या निवडणूक नोडल अधिकारी उपायुक्त […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com