नागपूर :- आज दिनांक 21 जानेवारी 2023 रोजी आम आदमी पार्टी कार्यालय नागपूर येथे आम आदमी पार्टीची पत्रकार परिषद घेण्यात आली. ही पत्रकार परिषद महाराष्ट्र उपाध्यक्ष धनराज वंजारी व नागपूर विभागीय शिक्षक मतदार संघाचे उमेदवार डॉ. देवेंद्र वानखडे यांनी घेतली. या निवडणुकीत प्रस्थापित पक्ष्यांचे व पक्ष समर्थित उमेदवार अनेक वर्षांपासून लढत आहेत. आम आदमी पार्टी ही निवडणूक पहिल्यांदा लढवित आहे. आम आदमी पार्टीचे उमेदवार डॉ देवेंद्र वानखडे हे उच्च शिक्षित आहेत, सध्या कॉलेज मध्ये प्राध्यापक आहेत, त्यांना शिक्षकांच्या सर्व समस्या व अडचणी माहीत आहेत, हे या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत उतरल्यामुळे निवडणुकीला नवीन आयाम मिळालेला आहे. आम आदमी पार्टीच्या दिल्ली सरकार शिक्षा मॉडेल शिक्षकांना चांगल्या प्रकारे प्रभावित करीत आहे. यामुळे नागपूर विभागातल्या प्रचार दौऱ्यावर डॉ देवेंद्र वानखडे यांना शिक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळतोय.
विद्यमान आमदार नागो गाणार यांच्या विरोधात प्रचंड रोष आहे, त्यांचे सरकार असून सुद्धा जुनी पेन्शन लागू झाली नाही, zp किंवा मनपाच्या हजारो शाळा बंद केल्यामुळे हजारो शिक्षक नोकरी पासून वंचित झालेत, केवळ नागपूर मनपाच्या जवळपास 300 शाळा बंद केल्या त्यामुळे पाच हजार प्रशिक्षित शिक्षक नोकरीस मुकले आहेत, याला जबाबदार केवळ विद्यमान आमदार व बिजेपी सरकार आहे.
महाराष्ट्रात काय आहे शिक्षणाची वास्तविकता यावर हे निवडणूक निर्भर आहे. या आधीच्या सरकारने व त्याच बरोबर शिक्षक मतदारसंघाच्या आमदारांच्या जोडीने राज्यातील शिक्षण व्यवस्था मोडकळीस काढली आहे. जुनी पेन्शन बंद केली, शिक्षणावरील बजेट कमी करून 3 % पर्यंत केले, शाळा-कॉलेज मध्ये जागा भरणे बंद केले, शाळा-कॉलेज ला मिळणारी नॉन शालरी ग्रांट बंद केली, बिना अनुदानित शाळा-कॉलेज ला अनेक वर्षांपासून अनुदानित न करणे,शिक्षकांना सेवेत कायम न करणे, शिक्षण सेवकांच्या नावावर शोषण,/तासिका तत्त्वावरील शिक्षकांना तासिकेकरिता केवळ 54 रुपये देणे, CBSE शाळेतील RTE च्या विद्यार्थ्यांचे अनुदान वेळेवर न देणे, शिक्षकांना शिक्षण बाह्य कामात व्यस्त करणे, शिक्षणाचे खाजगीकरण व व्यावसाईकीकरण करणे, सुविधा निर्माण न करता कमी पट संख्येच्या नावावर अनुदानित शाळा बंद करणे, आदिवासी आश्रम शाळा किंवा रात्र शाळांची परिस्थीती फारच वाईट केली. एकूणच शिक्षण व्यवस्था मोडकळीस काढण्याचे बीजेपी, सेना, कॉंग्रेस, राका यांचे धोरण असल्यामुळे वर्षोनुवर्षे वरील प्रश्न निकाली निघत नाहीत, ही वास्तविकता आहे.
दिल्लीत अरविंद केजरीवाल सरकार कडून शैक्षणिक क्रांती घडून आणण्याकरता एक मोठा प्रयास झाला आहे. दिल्ली व पंजाब येथे जुनी पेन्शन योजना लागू केली, वर्ड-क्लास शिक्षण व्यवस्था निर्माण केली, शिक्षणाचे बजेट डबल म्हणजे एकूण बजेट च्या 24 % केले, प्राचार्य व शिक्षकांना विदेशात प्रशिक्षणासाठी पाठविले, गेस्ट टीचर चे वेतन डबल म्हणजे महिन्याला ३० हजारापर्यंत केले, शाळांचे इन्फ्रास्ट्रक्चर अतिशय उत्तम केले, बिल्डींग, लाईब्र्री, लेबोरेटरीज, क्रीडांगणे, टर्फ, स्विमिंगपूल, टोईलेट इत्यादी, शाळेतल्या व्यवस्था निर्माण केल्या, स्कील बेस अभ्यासक्रम लागू केला, शाळेच्या देखभालीची जबाबदारी नवीन व्यस्थापक नेमून त्यांना दिली, शिक्षकांना इतर सर्व जबाबदारीतून मुक्त केले, याचे परिणाम दिल्लीच्या सरकारी शाळेचे निकाल ९८% पर्यंत यायला लागले, विद्यार्थी NEET & JEE क्रॅक करीत आहेत. शाळेतील मुलांना कंपन्यांकडून प्रोजेक्ट मिळत आहेत. आज संपूर्ण देशात दिल्ली व विदेशात सुद्धा याची चर्चा व्हायला लागली.
दिल्लीच्या धर्तीवर आपल्या राज्यात शिक्षण व्यवस्था नीट करण्यासाठी, खऱ्या अर्थाने आपले प्रश्न सदन मध्ये मांडण्यासाठी आम आदमी पार्टी समर्थित आपला शिक्षक प्रतिनिधी निवडून देण्यासाठी पहिली पसंती द्यावी असे महाराष्ट्र उपाध्यक्ष धनराज वंजारी म्हणाले.
आम आदमी पार्टी दिल्लीच्या सरकारचे शिक्षण क्षेत्रातले जे ग्रणीय काम आहेत त्यामुळे शिक्षक वर्ग पूर्ण देशात आप कड़े आकर्षित होत आहे. आम आदमी पार्टीने दिल्ली व पंजाब येथे जुनी पेन्शन स्कीम लागू केली. या निवडणुकीत जुनी पेन्शन स्कीम हा शिक्षकांकरिता सगळ्यात मोठा मुद्दा ठरलेला आहे. याआधी कोणत्याच प्रस्थापित पक्षाने ह्या मुद्द्यावरती राज्यात सकारात्मक भूमिका घेतली नाही. यामुळे शिक्षक वर्ग आम आदमी पार्टीकडे आकर्षित झाला आहे.
कोरोना काळात खाजगी शाळांच्या शिक्षकांची परिस्थिती फार बिकट झाली त्यावेळी कोणत्याच प्रस्थापित पक्षाच्या व विद्यमान आमदार यांच्या मार्फत कोणतीच मदत खाजगी शाळांच्या शिक्षकांना मिळाली नाही. आम आदमी पार्टी ने अनुदानीत व खासगी CBSE शाळा, कॉलेज, शाळेच्या शिक्षकानां व बाकी कर्मचारी यांना कैशलेस हेल्थ इन्षुरेन्स व खासगी शाळेंना RTE चे सरकारी अनुदान लवकर मिळावे हे ही मुद्दे घेतले आहेत. सोबतच शाला कॉलेज ला नॉन सैलरी ग्रांट मिळावी, बिना अनुदानित शाळेला अनुदान मिळावे, आदिवासी आश्रम शाळेचे अनुदान, रात्र कालीन शाळेचे प्रश्न इत्यादि याकरिता कार्य करण्याचा वचननामा दिला आहे. हि प्रेस वार्ता घेत असतांना या वेळी राज्य सहसचिव अशोक मिश्रा, राष्ट्रीय परिषद सदस्य अमरीश सावरकर, नागपुर संयोजक कविता सिंघल, नागपुर संघटन मंत्री शंकर इंगोले, नागपुर सचिव भूषण ढाकूलकर, सोशल मीडिया प्रमुख गीता कुहीकर, उत्तर नागपुर संयोजक रोशन डोंगरे, प्रा. निमजे, प्रा नितिन चोपड़े, संजय हेड़ाऊ, प्रभात अग्रवाल, जॉय बांगरकर, अभिजीत झा, विशाल वैद्य, विनीत गजबीए, रत्नजीत सोमकुवर व इतर पदाधिकारी कार्यकर्ते होते.