अवैध वाळू वाहतुकदारावर जुनी कामठी पोलिसांची धाड

संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी,

– 500 फूट अवैध वाळू जप्त,12 लक्ष 25 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त
कामठी ता प्र 18:-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या परिसरातून अवैधरित्या विना रॉयल्टी 10 चक्का ट्रक मध्ये वाळू वाहून नेत असलेल्या ट्रक वर जुनी कामठी पोलिसांनी धाड घालण्याची यशस्वी कारवाही आज दुपारी साडे बारा दरम्यान केली असून या कारवाहितुन 500 फूट रेती किमती 25 हजार रुपये व जप्त दहाचाकी ट्रक किमती 12 लक्ष रुपये असा एकूण 12 लक्ष 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत आरोपी गाडी चालक व गाडी मालक अशा दोन आरोपिना ताब्यात घेत कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक आरोपीचे नाव सुधाकर सोंनबावणे वय 46 वर्षे रा बिनासंगम, (ट्रकचालक),अनवर हुसैन शेख मुबारक हुसैन वय 36 वर्षे रा.यशोधरानगर नागपूर(ट्रकमालक)असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर आरोपी चालक हा आरोपी ट्रक मालकाच्या सांगण्यावरून जुना भानेगाव डब्लू सी एल ऑफिस जवळ मोकळ्या जागेवर डम्प केलेल्या रेती मधून जेसीबी च्या सहाय्याने टाटा कंपनीचा दहा चाकी ट्रक क्र एम एच 40 वाय 8991 ने 500 फूट रेती भरून वाहून नेत असता जुनी कामठी पोलिसांनी धाड घालून आरोपीस अटक केली.यातील अटक आरोपीना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही यशस्वी कार्यवाही पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित, एसीपी नयन आलूरकर यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल शिरे, डी बी स्कॉड चे साहाय्यक पोलीस फौजदार तंगराजन पिल्ले,गयाप्रसाद वर्मा, अश्विन चहांदे,अमित ताजने,विवेक दोरसेटवार,गोपाल टिके यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कन्हान येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकरना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण

Wed May 18 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कन्हान : – शहर विकास मंच कन्हान द्वारे आद्य मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यां च्या १७६ व्या पुण्यतिथी निमित्य कार्यक्रमाचे आयोज न करून त्याच्या प्रतिमेला मालार्पण करून भावपुर्ण श्रध्दाजंली अर्पण करित अभिवादन करण्यात आले. बुधवार (दि.१८) मे ला प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान समोरील ग्रीन जीम परिसरात आद्य मराठी पत्र कारीतेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com