नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचा इयत्ता बारावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाला आहे. कला, वाणिज्य, विज्ञान आणि व्यवसाय शाखा मिळून राज्यातून एकूण ९४.२२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
8 जूनला जाहीर झालेल्या महाराष्ट्र उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या तर्फे घेण्यात आलेल्या वर्ग बारावीच्या निकालात डॉ. राम मसूरके आरव अकॅडमी ऑफ सायन्स क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी उत्तम निकालाची परंपरा कायम ठेवली आहेत.क्लासेसचा निकाल 100% लागलेला आहे. त्यामधे प्रावीण्य श्रेणीत 80 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
प्रथम – स्नेहा पालीवार 93%
द्वितीय – विजया देवगडे 89%
तृतीय – आशी गायकवाड 88%
बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या उज्वल यशाचे श्रेय क्लासेसचे संचालक डॉक्टर राम मसूरके व शिक्षकांना दिले आहे. तसेच सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे संचालक, शिक्षक व शिक्षक्केत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहेत आणि विद्यार्थ्यांच्या पुढील आयुष्या करीता शुभेच्या दिल्या आहेत.