संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
– दहा पैकी पाच कांग्रेस तर पाच भाजप चे सरपंच पदी निवड
कामठी ता प्र 6 :- काल 5 नोव्हेंबर ला पार पडलेल्या कामठी तालुक्यातील दहा ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज 6 नोव्हेंबर ला कामठी तहसील कार्यालयात तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या मुख्य उपस्थितीत झालेल्या मतमोजणीतून जाहीर झालेल्या निकालात सरपंच पदासाठी निवसडणूक रिंगणात असलेल्या 31 उमेदवारांना थेट जनतेतून मतदान केलेल्या मतदानाच्या जाहीर निकालातून 10 सरपंच निवडून आले ज्यामध्ये कंग्रेस भाजप च्या खात्यात फिफ्टी फिफ्टी निकाल लागला तसेच 10 ग्रामपंचायत च्या 31 प्रभागातुन निवडणूक रिंगणात असलेल्या सदस्यपदातील उमेदवारातून 184 सदस्यांची निवड करण्यात आली.निवडणूक शांततेत पार पडली . जाहीर निवडणूक निकालानुसार बाबुलखेडा ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत भाजप समर्थित गटाचे छवारे कदीर इमाम यांनी 596 मते घेत काँग्रेस समर्थित गटाचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नवलकिशोर प्रल्हाद दडमल यांचा 157 मतांनी पराभव करून भाजप समर्थित गटाने बाबुळखेडा ग्रामपंचायत निवडणूक हॅट्रिक केली आहे. वारेगाव ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत काँग्रेस समर्थक गटाच्या रत्ना अजबराव उईके यांनी 566 मते घेऊन भाजप समर्थित गटाच्या शुभांगी सुरेंद्र मेश्राम यांचा 157 मतांनी पराभव करून सहाव्यांदा काँग्रेस च गटाचा झेंडा फडकवला. कवठा ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत भाजप समर्थित गटाचे निलेश श्रीधर डफरे यांनी 2136 मते घेत भाजप समर्थित गटाचे संतोष दामोदर रडके यांच्या 1062 मतांनी दारुण पराभव करून भाजप समर्थित गटाने विजय मिळवला . नेरी ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत भाजप समर्थीत चे गटाच्या सुजाता सुरेश पाटील यांनी 759 मते घेत कॉग्रेस समर्थित गटाच्या लक्ष्मी जितेंद्र वासनीक यांचा 110 मताने पराभव करून काँग्रेसच्या हातून सत्ता हिसकवण्यात यश मिळविला. उंमरी ग्रामपंचायतच्या निवडणुकीत काँग्रेस समर्थित गटाचे पवन पुरुषोत्तम सयाम यांनी ते 556 मे मते घेत भाजप समर्थित गटाचे मंगेश धोंडू उईके यांचा 61 मतांनी पराभव केला. गारला सरपंच पदाच्या निवडणुकीत गणपत हरिभाऊ वानखेडे यांनी 375 मते घेत भाजप समर्थित गटाचे राहुल मनोहर बोधारे यांच्या 66 मतांनी पराभव करून विजय मिळवला. नान्हा मांगली ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत काँग्रेस समर्थित गटाच्या रीना आम्रपाल वासनीक यांनी 384 मते घेत भाजप समर्थित गटाचे सोनू विनोद वासिनीक यांचा 50 मतांनी पराभव करून विजय मिळविला. या ग्रामपंचायतमध्ये विशेष असे की सात सदस्य संख्या असलेल्या सातही जागा भाजप संमर्थीत गटाने जिंकल्या आहेत. वरंभा ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत भाजप समर्थित गटाचे ज्योती कवडू भोयर यांनी 599 मते घेत काँग्रेस समर्थक गटाचे गीता शेषराज देवरे यांचा 187 मताने दारुण पराभव करून विजय संपादन केला .चिकना ग्रामपंचायत च्या सरपंच पदी भाजप समर्थित गटाचे लीना किशोर बेले यांनी 357 मते घेत काँग्रेस समर्थित गटाच्या पपीता धनराज बचाले अवघ्या पाच मताने दारुण पराभव केला. चिखली ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत काँग्रेस समर्थित गटाच्या मंगलागौरी विलास भोयर यांनी 432 मते घेत काँग्रेस बंडखोर अपक्ष उमेदवार मालती चुडामण वाडीभस्मे यांचा 151 मतांनी पराभव केला. तसेच वरंभा ग्रा प च्या प्रभाग क्र 2 च्या दोन उमेदवारांना 176 हे एकसमान मते मिळाल्याने वेळीच ईश्वरचिट्ठीचा वापर करण्यात आला.ज्यामध्ये रकमा बोरकर सदस्यपदी निवडून आल्या.हे इथं विशेष ! कामठी तालुक्यातील दहा ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत पाच ग्रामपंचायत वर भाजप समर्पित गटाचे तर पाच ग्रामपंचातवर काँग्रेस समर्थित गटाचे सरपंच विजयी झाले त्यानुसार कांग्रेस च्या वाट्याला आलेल्या पाच ग्रामपंचायतमध्ये वारेगाव, उमरी,गारला,नान्हा मांगली, चिखली चा समावेश आहे तर भाजप च्या वाटयाला आलेल्या पाच ग्रा प मध्ये बाबूलखेडा, कवठा, चिकना,नेरी,वरंभा ग्रा प चा समावेश आहे.तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या मार्गदर्शनात मतमोजणी ची प्रक्रिया योग्यरीत्या पार पाडण्यात आली निवडणूक मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता ठाणेदार प्रमोद पोरे यांच्या मार्गदर्शनात कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता . वारेगाव ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत रत्ना अजबराव उईके यांनी विजय संपादन करून सहाव्यांदा काँग्रेस गटाचे वर्चस्व निर्माण केले असून कामठी पंचायत समितीच्या सभापती दिशा चनकापुरे यांना आपल्या होमटाऊन गावात काँग्रेसचा विजय मिळवून सहाव्यांदा काँग्रेसची सत्ता निर्माण केली आहे भाजप समर्थित गटाच्या विजयासाठी महाराष्ट्र प्रदेश भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,आमदार टेकचंद सावरकर, नागपूर जिल्हा भाजप महामंत्री अनिल निधान , तालुका भाजप अध्यक्ष उमेश रडके, जिल्हा परिषद सदस्य मोहन माकडे यांनी तर काँग्रेस समर्थित गटाकडून नागपूर जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर ,जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती अवंतिका लेकुरवाळे ,प्रसन्ना उर्फ राजा तिडके,जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कंभाले, दिनेश ढोले यांनी विजयासाठी प्रयत्न केले.