संदीप कांबळे,कामठी
-बरीएम च्या स्थापना दिनी बहुजन-रिपब्लिकन नेते एकवटले
कामठी ता प्र 12:-भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाकरिता लढा देणार, बेरोजगारी दूर करण्याकरिता रिफायनरी प्रकल्प विदर्भात आणण्याकरिता पुढाकार करणार, बहुजन समाजाच्या शैक्षणिक व राजकीय आरक्षणाच्या मागणिला गतिमान करणार,महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्याकरिता केंद्र शासनास पाठपुरावा करणार इत्यादी महत्वपूर्ण ठराव बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या 16 व्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आले.
बहुजन रिपब्लिकन एकता मंच चा 16 वा वर्धापन दिन समारंभ काल सोमवार 11 एप्रिल ला सकाळी 11.30वाजता मधुरम सभागृह हिंदी मोरभवन , झांशी राणी चौक, सीताबर्डी नागपूर येथे आयोजित करण्यात आले होते.या समारंभाचे उदघाटन मराठा युवा मंच चे अध्यक्ष राजे जयसिंह भोसले यांनी केले.तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहुजन रिपब्लिकन एकता मंच च्या संस्थापिका व संयोजिका माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे होत्या.
आपल्या राज्यात भ्रष्टाचार व बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्यां आहे त्याकरिता विदर्भामध्ये रोजगार निर्मिती व्हावी व 2 ते 3 लक्ष बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याकरिता रिफायनरी सारखे प्रकल्प विदर्भात येणे गरजेचे आहे तसेच प्रशासनामध्ये भ्रष्टाचार हा कँसर रोगासारखा पसरत असल्यामुळे याला आळा घालण्याकरिता आपण कटिबद्ध आहोत .विदर्भामध्ये रोजगार निर्मितो व प्रशासनामधील भ्रष्टाचार विरुद्ध बहुजन रिपब्लिकन एकता मंच लढा देणार अशी घोषणा ऍड सुलेखाताई कुंभारे यांनी अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले.
याप्रसंगी बहुजन रिपब्लिकन एकता मंच च्या माध्यमातून त्यांनी या देशातील बहुजन व वंचित समाजातिल व्यक्तींना नागरिक म्हणून संस्कार देण्याची खरी गरज असल्याचे नितीन चौधरी यांनी सांगितले.तसेच जाती पातीचे प्रश्न घेऊन लढण्यापेक्षा कॉमन मिनीमन प्रोग्रामवर तज्ञ बनण्याचा प्रयत्न करून एससी, ओबीसी ,एसटी प्रवर्गाना जागृत करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे असे ते म्हणाले.घनश्याम फुसे यांनी रिपब्लिकन नेते मंडळी वेगवेगळे असले किंवा वजजी सारखे विभागले तरी एकत्र येऊन चर्चा आणि बैठकी करतो याकडे लक्ष वेधले तसेच समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न सतत रिपब्लिक पक्ष एकत्र येण्यासाठी सुलेखाताईना पुढे येण्याचे आव्हानही फुसे यांनी यावेळी केले.इंदूताई मोरे यांनी सध्याच्या काळात जातीवाद अजूनही गेला नाही यामुळे व्यक्तीला स्वता जागृत होण्याची गरज असल्याचे सांगितले.सुलेखाताई कुंभारे ह्या झांशी की राणी आहेत त्यामुळे महिलांनी त्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे यावर मोरे यांनी भर दिला जमाते इस्लामे हिंदचे अध्यक्ष डॉ मोहम्मद अनवर सिद्दीकी यांनीही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाला तोडण्याचे काम धुविकरनाच्या माध्यमातून होत आहे.मराठा, आंबेडकरी आणि मुस्लिम समाज एकत्र आला तर 3 टक्के लोकांचा सफाया होण्यास वेळ लागणार नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले तर प्रा रमेश पिसे यांनी आम्ही दुसऱ्यांना मोठे करण्याच्या नादी लागलो आहोत म्हणून आमच्या अडचणी वाढल्या आहेत याकडे लक्ष वेधले तसेच ओबीसी समाजाची भूमिका यावेळी त्यांनी मांडली.
मराठा युवा मंच चे अध्यक्ष राजे जयसिंह भोसले यांनी मूक मोर्चाच्या माध्यमातुन मराठा समाजाला आरक्षण मिळण्याकरिता आंदोलन केले परंतु मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही यापुढे आरक्षण मागणीला गतिमान करण्यात येईल.बहुजन व रिपब्लिकन विचारधारेच्या लोकांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी ऍड सुलेखाताई कुंभारे यांचे अभिनंदन केले व या पुढील लढ्यात एकत्रितपणे लढण्याचे मत त्यांनी आपल्या उदघाटणीय भाषणातून स्पष्ट केले.
सुरुवातीला राजे जयसिंह भोसले व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले व परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलित करून समारंभाचे उदघाटन करण्यात आले.व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे स्वागत बरीएम चे विदर्भ महासचिव अजय कदम, जिल्हाध्यक्ष संदीपदादा कांबळे, व जिल्हा अल्पसंख्याक चे अध्यक्ष अश्फाक कुरेशी यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन बहुजन रिपब्लिकन एकता मंच च्या नागपूर शहर अध्यक्षा व नागपूर महानगर पालिकेच्या धंतोली झोनच्या माजी सभापती वंदना भगत यांनी केले व आभार प्रदर्शन बरीएम चे विदर्भ अध्यक्ष भीमराव फुसे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उदास बन्सोड, दिपंकर गणवीर, विष्णू ठवरे,दीपक सीरिया, चंद्रशेखर लांजेवार, शिवपाल यादव, ऍड गेडाम,रवी रंगारी, विलास चंदनखेडे, आनंद नाईक, अनुभव पाटील, अंकुश बांबोर्डे, सुनिल वानखेडे, सचिन नेवारे, नरेंद्र चव्हाण, चंदू कापसे, रेखा भावे,नंदा गोडघाटे, सावला सिंगाडे,सरोज रंगारी, रजनी लिंगायत, रत्नमाला मेश्राम, जया पानतावणे, माया कांबळे, संध्या गजभिये, वंदना आळे, इत्यादी बरीएम च्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.