पुण्यात धावत्या बाईकवर बिबट्याचा हल्ला

पुणे  – जुन्नर तालुक्यातील  बिबट्याच्या हल्ल्याचे (Leopard attack) सत्र सुरूच आहे. जुन्नर तालुक्यातील दत्तात्रय शिंदे आणि त्यांच्या पत्नी हौसाबाई शिंदे यांच्यावर बिबट्याने हल्ल्या केला आहे. जुन्नर जवळील बोरी बुद्रुक येथील सिद्धेश्वर मंदिराच्या जवळ बाईकवरून शिंदे दांपत्य जात असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण प्रसंगावधान दाखवत दत्तात्रय शिंदे यांनी बिबट्याने हल्ला केल्यानंतरही शिताफीने बाईक न थांबता स्पीडने पुढे नेली. मात्र, यादरम्यान गाडीवर मागे बसलेल्या हौसाबाई शिंदे यांच्या पायाला बिबट्याचा पंजा लागल्याने त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत.

हा बिबट्या ऊसामध्ये दबा धरून बसला होता. जुन्नर तालुक्यात बिबट्याचे प्रमाण वाढले असुन बहुतांश ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात पाळीव प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. एवढेच नव्हेतर तर बिबट्यानी आता माणसांवर हल्ले सुरू केल्याने जुन्नर तालुक्यातील ऊस उत्पादक गावामधील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

दुबईहून आलेले चार प्रवासी पॉझिटिव्ह

Wed Dec 22 , 2021
नागपुर – दुबईहून नागपुरात आलेले चार प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह सापडलेत. त्यामुळं नागपूर जिल्ह्यात 13 नव्या रुग्णांची भर पडली. गेल्या 12 दिवसांनंतर कोरोना बाधितांच्या रुग्णसंख्येचा आकडा हा दुहेरी झाला. त्यामुळं कोरोनाचा धोका नागपुरात वाढला आहे. नमुने जनुकीय चाचणीसाठी पाठविले आहे . दुबईतून नागपुरात आलेल्या चार प्रवाशांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळं त्यांना एम्समध्ये स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले आहे. 40 व 29 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com