-दिनेश दमाहे
नागपुर – दि. 27.02.2022 चे 00ः20 वा चे सुमारास फिर्यादी सरतर्फे पोहवा सिध्दार्थ पाटील हे पोलीस स्टेशनला कर्तव्यावर हजर असतांना गुप्त बातमीदारा कडुन मिळालेल्या माहीती वरून स्टाफॅ व पंचासह जावुन पाहणी केली असता आरोपी क्र. 1) स्वप्निल उर्फ लाका वसंतराव देरकर, वय 23 वर्ष, रा. प्लॉट नं. 67,महाविष्णु नगर, नरसाळा रोड, नागपूर, 2) अविनाश उत्तम रंगारी, वय 22 वर्ष रा. ठोमरा, पोस्टे. उदासा, ता. उमरेड, जिनागपूर,3) नितिन तुळशीराम द्रूगवार, वय 30 वर्ष, रा. किर्ती नगर, व्हि. एम. पॅराडाईज सोसायटी, ब्लॉक नं. 108, नागपूर
व इतर दोन फरार आरोपी इसम हे घटनास्थळी दरोडा टाकण्याचे योजना करीत असतांना दरोडा टाकण्याचे साहित्यासह
मिळुन आले तसेच त्यामधील दोन आरोपी फरार झाले असुन त्यांचे जवळुन 1) लोखंडी दाते असलेले दोन रॉड, प्रत्येकी
कि. अं. रू. 300/-, असा रू. 600/- 2) एक लोखंडी चाकु किं.अं. रू. 100/- 3) नायलानॅ दोरी कि.अं. रू.
50/- 4) मिरची पावडर किं.अं. रू. 20/- असा एकुण रू. 770/- चा मुद्येमाल घटनास्थळी अंगझडती जप्ती
पंचनामा प्रमाणे जप्त करून फिर्यादीचे रिपोर्ट वरून गुन्हा कलम 399, 402 भादवि सहकलम 4+25 भाहका सहकलम
135 मपोका प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कामगिरी (परि.क्र.4) नागपूर शहराचे पोलीस उपायुक्त नरूल हसन, सहायक पोलीस आयुक्त(सक्करदरा विभाग )पुंडलिक भटकर यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि किशोर नगराळे, पोनि(गुन्हे) दिपक भिताळे, पोउपनि दिलीप रहाटे पोहवा सिध्दार्थ पाटील, नापोअं. संदीप गवळी, पंकज तांबडे, पो.अं. विनादे झिंगरे प्रेमकुमार खैरकर, शरदसिंह टेंभरे यांनी केली आहे