संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- मागील काही दिवसांपूर्वी कामठी तालुक्यातील भिलगाव येथे एका घरातून अचानक जवळपास 30 सापांच्या पिल्ल्यांचा झुंड निघाल्याच्या घटनेला विराम मिळत नाही तोच 1 मे च्या दिवशी छावणी परिषद कामठी परिसरातील नितीन सहारे यांच्या घरात सुद्धा 40 च्या वरील सापांच्या पिल्ल्यांचा झुंड निघाल्याने सर्वत्र चर्चेचा विषय ठरत असून कामठी तालुक्यात सापांच्या पिल्ल्यांचा सुळसुळाट पसरला आहे.
साप म्हटलं की भल्या भल्यांची बोबडी वळते, भुवया उंचावतात, थरकाप सुटतो मग घरात जर इतक्या मोठ्या प्रमाणात सापांचा झुंड निघत असेल तर भीती वाटणे साहजिकच सुदैवाने हे साप विषारी नसल्याने अनुचित घटना टळली असली तरी अश्या प्रकारापासून सावधता बाळगणे गरजेचे आहे.वास्तविकता सापाने अंडे दिल्यानंतर त्या अंड्यातून बाळांचा जन्म झाल्यास साप ती जागा सोडून देतो मात्र साप घरात आहे असे माहीत पडले तर कुणालाही झोप लागणार नाही.घरात किंवा परिसरात साप दिसल्यास घाबरून न जाता त्याच्या हालचालीकडे लक्ष द्यावे.परिसरातील प्राणीमित्र व सर्पमित्र यांना त्यांची त्वरित माहिती द्यावी.सापाला पकडण्याचा किंवा डीवचण्याचा प्रयत्न करू नये.
साप निघाल्यास काय कराल?
साप घरात आढळल्यास न घाबरता शांत राहा,सर्पमित्राशी त्वरित संपर्क साधा,त्याच्या हालचालीकडे बारकाईने लक्ष द्या,लहान मुले,पाळीव प्राण्यांना सापापासून दूर ठेवा.सापाजवळ जाण्याचा अथवा छायाचित्र काढण्याचा प्रयत्न करू नये.
भारतात चारच साप विषारी आहेत त्यापैकी आपल्याकडे नाग, मण्यार,घोणस व फुरसे हे चारच विषारी साप आहेत.इतर साप बिनविषारी तसेच निमविषारी आहेत.
त्यांच्यापासून मानवाला कोणताही धोका नसल्याचे तज्ञ सांगतात..