वन विकास महामंडळ मधील अधिकारी व कर्मचारी यांचे अखेर आंदोलनाला स्थगिती

– देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांच्या सोबत संघटना पदाधिकाऱ्यांची बैठक होउन त्यांच्या आश्वासनाने सदर आंदोलनाला स्थगिती दिली 

नागपूर :-महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळातील अधिकारी, कर्मचारी यांचे संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेले अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन आठ दिवसापासून सुरू होते सदर आंदोलनाच्या अनुषंगाने आज नागपूर येथे मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळ अधिकारी व कर्मचारी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील कार्याध्यक्ष बी.बी.पाटील सरचिटणीस रमेश बलैया उपाध्यक्ष रवी रोटे सचिव सुधाकर राठोड आदी पदाधिकाऱ्यांना मा. उपमुख्यमंत्री यांनी बैठकीचा निमंत्रण दिलं होते सदर बैठकीत वनविकास महामंडळातील अधिकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा फरक देण्यासंदर्भात अधिवेशन संपल्यावर या विषयावर बैठक घेऊन न्याय देऊ असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले असता महाराष्ट्रभर सुरू असलेले वनविकास महामंडळ मधील अधिकारी कर्मचारी यांचे अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन तसेच संपूर्ण काम बंद आंदोलनाला आज रोजी दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी रात्री आठ वाजता सदर आंदोलनाला स्थगिती देऊन महामंडळातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना कर्तव्यावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे याबाबत संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील यांनी माहिती दिली.

NewsToday24x7

Next Post

आयटीआयतील अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांच्या अनुदान वाटपात भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांचे होणार निलंबन

Sat Dec 9 , 2023
नागपूर :- सेलू (जि. वर्धा) तालुक्यातील आयटीआयतील अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्ता, विद्या वेतन अनुदान वाटपातील भ्रष्टाचार प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधान परिषदेत दिली आहे. विधान परिषद सदस्य आमदार उमा खापरे यांनी सदर प्रकरणाबाबत मुद्दा उपस्थित केला होता. Your browser does not support HTML5 video. उपस्थित केल्या गेलेल्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com