संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- येत्या 20 नोव्हेंबर ला होऊ घातलेल्या कामठी मौदा विधानसभा निवडणुक प्रचार जोमात सुरू असून निवडणूक रिंगणात 19 उमेदवार आहेत.यातील राजकीय पक्षाचे 11 तर 8 अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे त्यातच सहा मुस्लिम तसेच इतर समाजबांधव उमेदवाराचा समावेश आहे मात्र या निवडणुकीत निवडणुकीच्या पाश्वरभूमीवर उमेदवाराचे पक्ष ,पक्षाची विचारधारा,पक्षचिन्ह, या सर्व बाबींचा विचार करून मतदार आपल्या मतदानातुन पसंतीचा उमेदवार भावी उमेदवार ठरविणार असला तरी या 2024 च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत समावेश असलेल्या सर्व उमेदवारांच्या तुलनेत थेट लढत असलेले कांग्रेस चे उमेदवार सुरेश भोयर व भाजप चे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पक्ष आणि पक्षाच्या चिन्हाऐवजी उमेदवारांच्या नावाचीच चर्चा अधिक आहे.त्यातूनच मतदार आपल्या पसंतीचा उमेदवार निवडनार असला तरी यंदाच्या निवडणुकीत पक्षपेक्षा उमेदवाराची कार्यशैली मतदारांना आकर्षित करण्यासाठी अधिक प्रभावी ठरत आहे.
कामठी मौदा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा सुरू झाला आहे. रॅली,प्रचारसभा, गृहभेटी आदींच्या माध्यमातून उमेदवार व त्याचे समर्थक कार्यकर्ते मतदारपर्यंत पोहोचत आहेत तर दुसरीकडे मतदार देखील उमेदवारांना घेऊन चर्चा करू लागले आहेत.कामठी मौदा विधानसभा निवडणूक ही अत्यंत चुरशीची होत आहे. भाजप चे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भाजप पक्षाला बहुतांश मतदार पसंत करीत नसले आणि पक्षविरोधी विरोधात्मक मतभेद विचारसरणी असली तरी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राजकारणातील कार्यशैली, समाजाची बांधिलकी आणि सर्व सामुदायिक समाजासाठी सतत धडपड करण्यासह मतदारांशी असलेल्या व्यक्तिक संबंध लक्षात घेऊन मतदान करणारे बहुतांश मतदार हे भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांना मोठ्या प्रमाणात मतदान करण्याच्या मानसिकतेत दिसुन येत आहेत तर त्याच तुलनेत कांग्रेस उमेदवार सुरेश भोयर यांच्याकडे काही प्रमाणात च मतदारांचा मतदान कौल दिसून येत आहे. तर कामठी मौदा विधानसभा मतदार संघात पक्ष व चिन्हपेक्षा उमेदवाराला महत्व देण्याची चर्चा जोमात सुरू आहे त्यात उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाची चर्चा सार्थक ठरत आहे.