अमरदिप बडगे,प्रतिनिधी
गोंदिया शहराचे होणार ड्रोन सर्वेक्षण गेल्या 75 वर्षात झाले नव्हते गोंदिया शहराचे भूमापन सवेक्षण
नागरिकांना मिळणार हक्काची क प्रत
गोंदिया – गोंदिया शहराचा गेल्या 75 वर्षापासून भूमापन सर्वेक्षण करण्यात आले नसल्याने त्याच्या फायदा अनेक भू माफिया नी घेताना असताना. मात्र आता जिल्हा भूमी अभिलेख विभागाने गोंदिया शहराचे नगर परीषद क्षेत्रातील भूमापन सिटी सर्वेक्षण ड्रोन द्वारा करण्यात येणार असून या सर्वेक्षण मुळे नगर परीषद क्षेत्रातील नागरिकांना कायम स्वरुपी त्यांच्या हक्काची ” क ” प्रत मिळणार असून त्यामुळे कर्ज घेण्यास आणि इतर कार्यालयीन कामकाज त्याचा उपयोग गोंदिया शहरातील नागरिकांना होणार आहे. व भूमाफियांनी आता वचक बसणार हे मात्र नक्की…