नागपूर :- पोलीस स्टेशन बुट्टीबोरी अंतर्गत दिनांक २३/ १०/२०२४ रोजीचे १६/०० ते १७/०० वा पर्यंत विधानसभा निवडणूक संबंधाने दीपक अग्रवाल (भा.पो.से.) उपविभागीय पोलीस अधिकारी नागपूर विभाग नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपस्थितीत पोलीस स्टेशन चौक बुटीबोरी ते शिवाजी चौक, मुख्य मार्केट दुर्गा मंदीर, लुबिनी विहार, आर.एस.जी टाऊन मैदान पर्यंत तसेच मौजा सातगाव मुक्ताई हॉस्पिटल ते जिल्हा परिषद शाळा ते गौरकर किराणा ते ज्ञानदीप शाळा चौक पर्यंत रूट मार्च घेण्यात आला. असता रूट मार्चमध्ये पोलीस स्टेशन बुटीचोरी येथील ०३ अधिकारी, १४ अंमलदार तसेच सशस्त्र सीमा बल चे पथक हजर होते.
रूट मार्च दरम्यान आर. एस. जी. टाऊन मैदान बुटीबोरी व सातगाव ज्ञानदीप शाळा चौक येथील नागरिकांना सशस्त्र सीमा बल चे अधिकारी व कर्मचारी यांनी आगामी विधानसभा निवडणूक संबंधाने कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता मतदान करण्याबाबत आव्हान करण्यात आले. पोस्टे कन्हान अंतर्गत दिनांक २३/१०/२०२४ रोजी १८:३५ ते १९:१० वाजे पर्यंत संतोष गायकवाड उपविभागिय पोलीस अधिकारी उपविभाग कन्हान यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपस्थितीत डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते नाका नंबर ७, गांधी चौक ते पोलीस स्टेशन कन्हान असा रूटमार्च घेण्यात आला.
रूटमार्च दरम्यान पोलीस अधिकारी यांनी नागरिकांसोबत संवाद साधुन त्यांना निवडणुक संबंधाने मार्गदर्शन करण्यात आले तसेच तसेच भयमुक्त तसेच शांततेत निवडणुक पार पाडण्याबाबत चर्चा करण्यात आली. सदर रूटमार्च पोलीस स्टेशन कन्हान चे ५ अधिकारी, १६ अंमलदार तसेच सशस्त्र सिमा बलातील ३ अधिकारी व ३० अंमलदार हजर होते..