अवैध रेती वाहतुक करणाऱ्या २ ट्रकवर कारवाई;एकूण 10,30,000/- चा मुद्देमाल जप्त

नागपुर – पोलिस उपायुक्त विनीता साहू यांनी परिमंडळ क्र.२ च्या हद्दीतील अवैध धंदयावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले. त्यावरून दिनांक 07/01/2022 चे सकाळी 05/00 वा. पासून  पोलिस स्टेशन मानकापूर हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, जरिपटका रोडकडून मानकापूर चौकाकडे दोन सहाचाकी ट्रक अवैधरित्या बिना रॉयल्टीने रेती घेवून येत आहेत. अशी खात्रीषिर माहिती मिळाल्याने त्यावर रेड कार्यवाही करण्याकरिता मानकापूर चौक येथे स्टॉफसह नाकाबंदी लावली असता दोन सहाचाकी ट्रक येतांना दिसले. सदर दोन्ही ट्रकला थांबवून त्यांना विचारपूस केली असता 1) टाटा कंपनीचे वाहन क्र एम.एच/31/सी.बी/7856 त्यामधील चालक क्रिश्णा प्रितम कावरे, वय 32 वर्ष रासमतानगर झोपडपट्टी, साहू चक्की जवळ, पो.स्टे. कपीलनगर, नागपूर असे सांगितले. त्या ट्रकची रेतीसह किंमत रू 5,15,000/-, तसेच 2) टाटा कंपनिचे सहाचाकी वाहन क्र. एम.एच./ 40/3881 त्यामधील चालक महेंद्र अंकुश वाहने, वय 44 वर्श, रा. रामनगर, आनंदनगर, जुनी कामठी, नागपूर असे सांगितले. सदर ट्रकची रेतीसह किमं त रू 5,15,000/- असे एकूण रू 10,30,000/- चा मुद्देमाल असून सदर वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये रेती दिसून आली. त्यावरून नमुद दोन्ही वाहनचालकास वाहनात असलेल्या रेती संबंधाने गौनखनीज वाहतुक परवाना/रॉयल्टी बाबत विचारपूस केली असता त्यांनी  रॉयल्टी नसल्याचे सांगितले. सदर बाबत सुर्यकांत पाटील, तहसिलदार, महसुल विभाग, नागपूर यांना माहिती दिली तसेच त्यांनी सांगितले वरून, सदरचे दोन्ही वाहन रेतीसह पो.स्टे. मानकापूर च्या आवारात आणुन लावले. तसेच दोन्ही वाहन चालकांना वाहन व्यवस्थित लॉक करण्याची सुचना देउन सदर दोन्ही वाहन व रेती असा एकूण रू 10,30,000/- चा मुद्देमाल जप्त करून पो.स्टे. मानकापूर येथे जमा करण्यात आलेला आहे तसेच तहसिलदार, तहसिल कार्यालय, नागपूर यांना नमुद दोन्ही वाहन हे बिना रॉयल्टीने व वाहतुक परवानाषिवाय रेती वाहतुक करतांना मिळून आल्याने त्याचे विरूध्द गुन्हा दाखल करणे करिता पुढील कार्यवाही होणेबाबत पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे सदरील कारवाई नागपूर शहराचे मा. पोलीस उपायुक्त (परि क्र. 2) श्रीमती विनीता साहू यांचे मार्गदर्शनाखाली पो.उपनि कुणाल धुरट, वाचक पो.उपआ परि. 2, नागपूर शहर, पेाहवाप्रमोद अरखेल, महेश बावणे, नापोशि जयंता , शफी खतीब, पोशि आकीब शेख यांनी केली.

-दिनेश दमाहे
9370868686
dineshdamahe86@gmail.com

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

लग्न संभारंभात कोविड नियमांचे उल्लंघन, ३ लॉन वर कारवाई करीत शोध पथकाने ७५ हजारांचा दंड वसूल

Fri Jan 7 , 2022
नागपूर, ता. ७ :  नागपूर महानगरपालिकेतर्फे लग्न समारंभात कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे. मनपाच्या मंगळवारी झोन अंतर्गत लक्ष्मी लॉन, गोरेवाडा, के.आर. सी लॉन गोरेवाडा आणि आमराई लाँन  यांच्या विरुद्ध कोविड नियमांचे उल्लंघन करण्याबद्दल रु २५ हजार प्रत्येकी असे रु ७५,००० चा दंड लावण्यात आला. मनपा आयुक्त श्री राधाकृष्णन बी यांनी नुकतेच एक आदेश काढून लग्न समारंभात ५० लोकांची उपस्थितीचे बंधन घातले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com