– कळमेश्वर पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण यांची संयुक्त प्रतिबंधक कारवाई
कळमेश्वर :-दिनांक २८/१०/२०२३ रोजी पोस्टे कळमेश्वर हद्दी तील गोंडखैरी येथील पारधी बेडा येथे मोठया प्रमाणावर गावठी दारू तयार करून आजुबाजुचे परिसरात विक्री करणार असल्याची गोपनीय खबर कळमेश्वर पोलिसांना मिळाल्याने पोलिस अधीक्षक हर्ष ए. पोदार, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले, पोलीस उपविभागीय पोलिस अधिकारी सावनेर अजय चांदखेडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण येथील पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे तसेच पोलिस स्टेशन कळमेश्वरचे प्रभारी अधिकारी यशवंत सोळसे, पोलीस निरीक्षक संतोष दाबेराव यांचे नेतृत्वाखाली आज दि. २८/१०/२०२३ रोजी पोलिस स्टेशन कळमेश्वर हद्दीतील गोंडखैरी पारधी बेडा येथे सुरू असलेल्या अवैध दारुभट्टीवर छापे मारून एकुण किंमती १०,७५८५० /- रूपयाचा मुद्देमाल जप्त करून एकुण ०८ आरोपीतांवर पोलिस स्टेशन कळमेश्वर येथे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे. कारवाई दरम्यान एकुण ९९६० लिटर कच्चे रसायन सडवा २५६ लिटर गावठी तयार दारू दारू बनविण्याचा गुळ ८६० किलो व दारू तयार करणेकामी लागणारे साहीत्य जप्त करून गावठी दारूच्या भट्ट्या उद्धवस्त करण्यात आल्या आहे.
सदरची कारवाईसाठी पोलीस स्टेशन कळमेश्वर येथील पोलीस निरीक्षक यशवंत सोळसे, संतोष दावेराव, सहायक पोलीस निरीक्षक तेजराम मेश्राम, दिलीप पोटभरे, पोलीस उपनिरीक्षक मनोज टिपले व २७ अंमलदार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहायक पोलीस निरीक्षक आशिपसिंग ठाकुर, पोलीस उपनिरीक्षक आशिष मोरखेडे व २५ अंमलदार पोलीस मुख्यालय येथील आर सी पी पथक, क्यु. आर. टी पथक, पोलीस स्टेशन सावनेर येथील सहायक पोलीस निरीक्षक भस्मे, ०२ अंमलदार, पोस्टे खापा येथील ०१ अधिकारी व ०३ अंमलदार असे संयुक्तिकपणे पार पाडली.