– कळमेश्वर पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण यांची संयुक्त प्रतिबंधक कारवाई
कळमेश्वर :- कळमेश्वर पोलिस स्टेशन हद्दीतील गोंडखैरी येथील पारधी बेडा येथे मोठ्या प्रमाणावर अवैध गावठी दारू तयार करून तिची मोठ्या प्रमाणावर आजुबाजुचे परीसरात विक्री होत असल्याची गोपनिय खबर कळमेश्वर पोलिसांना मिळाल्याने पोलिस अधिक्षक हर्ष ए. पोहार (भा.पो.से.), मा, अपर पोलिस अधिक्षक डॉ. संदिप पखाले, उपविभागीय पोलिस अधिकारी सावनेर विभाग सावनेर अजय चांदखेडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक प्रभारी ओमप्रकाश कोकाटे यांचेसह पोलिस स्टेशन कळमेश्वरचे प्रभारी अधिकारी यशवंत सोळसे यांचे नेतृत्वाखाली दिनांक १८/०९/ २०२३ रोजी पहाटे ०७.०० वा. सुमारास पोलिस स्टेशन कळमेश्वर हंदीतील गोंडखैरी पारडी बेडा येथे सुरू असलेल्या अवैध दारू भट्टीवर छापे मारून एकूण जवळपास २३ लाख ५८ हजार ५० रूपयाचा मुद्देमाल जप्त करून एकुण १३ आरोपीतांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये कारवाई करण्यात आली आहे. सर्व आरोपीतांवर पोलिस स्टेशन कळमेश्वर येथे दाखल करण्यात आले असून सदर कारवाई दरम्यान एकुण २१ हजार २६० लिटर कच्चे रसायन सडवा किंमती २९ लाख २६ हजार रू १५७३ लिटर तयार दारू किंमती ०१ लाख ५७ हजार ३०० रू. जप्त करण्यात आली असून दारूभट्टी साठी लागणारे एकुण इतर साहित्य इम, घमेले व दारू तयार करणेकामी लागणारे साहीत्य किंमती अंदाजे ७४७५०/- रू जप्त करून गावठी दारूच्या भट्टया उद्धवस्त करण्यात आल्या आहे.
सदर कारवाईसाठी पोलीस स्टेशन कळमेश्वर येथील ठाणेदार यशवंत सोळसे, सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पोटभरे, तेजराम मेश्राम, पोलीस उपनिरीक्षक मनोज टिपले, महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका गेडाम व इतर ३३ पोलीस अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखा नागपूर येथील पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे तसेच २० अमलदार, पोलीस मुख्यालयाचे आर. सी. पी पथक त्याचप्रमाणे नागपूर शहरचे अधिकारी व ५० अमलदार यांनी पार पाडली..