प्रत्येक ग्रामपंचायतीने ठराव घेऊन विधवा प्रथा बंद करा-एसडीओ श्याम मदनूरकर

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 19:-कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळे तालुक्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने 5 मे 2022 रोजी आयोजित ग्रामसभेत विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव सर्वानुमते घेतला आहे.अशाच प्रकारे राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी ठराव घेऊन विधवा प्रथा कायमची हद्दपार करण्याचे आदेश शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिले आहेत तेव्हा या आदेशाचे पालन करीत कामठी मौदा उपविभागीय अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक ग्रामपंचायतीने शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिलेल्या आदेशाचे जनजागृती करून आदेशाचे पालन करीत ग्रामसभेचा ठराव घेऊन विधवा प्रथा कायमची बंद करण्याच्या ठरावाला मंजुरी द्यावी असे आव्हान कामठी मौदा उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर यांनी केले आहे.
आज विज्ञानवादी व प्रगतिशील समाज म्हणून आपण वाटचाल करीत असलो तरीही पतीच्या निधनावेळी पत्नीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे,हातातील बांगड्या फोडणे , पायातील जोडवी काढली जाणे यासारख्या प्रथांचे पालन केले जात आहे. पतीचे निधन झाल्यानंतर त्याच्या पत्नीला विधवा म्हणून समाजात वावरत असताना अव्हेलनेस सामोरे जावे लागते.या महिलांना त्यानंतर समाजात कोणत्याही प्रकारच्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात बहुधा सहभागी होऊ दिले जात नाही.या कुप्रथांचे पालन होत असल्याने अशा व्यक्तींच्या प्रतिष्ठेने जीवन जगण्याच्या मानवी अधिकाराचे तसेच भारतीय संविधानाने बहाल केलेल्या समतेच्या हक्कांचेही उल्लंघन होते.त्यामुळे अशा प्रथेचे निर्मूलन होणे ही काळाची गरज आहे.सदर बाबी लक्षात घेता विधवा प्रथा निर्मूलन होण्याच्या अनुषंगाने समाजात व्यापक ज जनजागृती होणे आवश्यक आहे.या अनुषंगाने तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व संबंधितांना निर्देश देण्याची बाब् विचाराधिन होतो .विधवा महिलांना इतर महिलाप्रमाणे सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे.यामुळे अशा प्रथेचे निर्मूलन होणे आवश्यक आहे.सबब प्रथेचे पालन करणे अनुचित असून त्याबाबत समाजात व्यापक जनजागृती होणेंच्या अनुषंगाने उचित कार्यवाही होणेबाबत एसडीओ श्याम मदनूरकर यांनी सर्व अधिनस्त ग्रामपंचायत पदाधिकारो, अधिकारी व कर्मचाऱ्यांना आव्हानात्मक सूचित केले आहे की राजश्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मुर्ती शताब्दी वर्षात त्यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेण्याच्या दृष्टीने ग्रामविकास विभागाने 17 मे रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार शासनाच्या आदेशाचे पालन करीत प्रत्येक ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ठराव घेऊन विधवा प्रथा कायमची हद्दपार करा असे आव्हान एसडीओ श्याम मदनूरकर, तहसीलदार अक्षय पोयाम, बीडीओ अंशुजा गराटे यांनी केले आहे.

-सुरेश भोयर माजी जी प अध्यक्ष
—प्रत्यक्ष जनजागृती महत्वाची
—शासनाने ग्रामसभेत ठराव पारीत करण्याचे आदेश दिले असले तरी प्रत्यक्ष याबाबत जनजागृती करून कृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.पतीच्या मृत्यूनंतर महिलेच्या वाट्यास सामाजिक अवलेहना आल्याच्या घटना द्रुष्टीक्षेपास पडतत्व, तिची मानसिक कुचंबणा होते त्यामुळे शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले जात असून प्रत्यक्ष जनजागृती व कृती महत्वाचे असल्याचे मत माजी जो प अध्यक्ष सुरेश भोयर यांनी व्यक्त केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

वादळी पावसात वीज कडाडून दोन गायीचा दुर्दैवी मृत्यु

Thu May 19 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 19:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गादा गावात काल मध्यरात्री 2 दरम्यान झालेल्या वादळी पावसात वीज कडाडून शेतात बांधलेल्या दोन गायीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. प्राप्त माहितीनुसार काल मध्यरात्री कामठी तालुक्यात सर्वत्र वादळी पावसासह विजेचा कडकडाट सुरू होता दरम्यान विद्दुत पुरवठा सुद्धा खंडित झाला होता.त्यातही वादळी पाऊस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com