संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 19 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या यादव नगर रहिवासी विवाहित तरुणाने सहा महिन्यांपासून सोडून गेलेल्या पत्नीच्या विरहात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली असून मृतकाचे नाव जितेंद्र रामाच्या मिश्रा वय 35 वर्षे रा. यादव नगर कामठी असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक हा विवाहित असून मागील सहा महिन्यांपूर्वी पत्नी घर सोडून निघून गेल्याने पत्नीच्या विरहात एन्द्रील नामक विषारी औषध पिल्याची घटना राहत्या घरी सोळा डिसेंबर ला केले असता उपचारार्थ नागपूर च्या मेयो इस्पितळात हलविण्यात आले .आज सकाळी 8 दरम्यान उपचारादरम्यान मृत्यू झाला असून पोलिसांनी यासंदर्भात घटनेची नोंद केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पिल्ले करीत आहेत.मृतकाच्या पाठिमागे कुटुंबात आई,पत्नी व एक मूलगा व एक मुलगी असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.