विदर्भ कुंभार समाज सुधार समिती महिला मंडळाचे आयोजन
अमरावती :- विदर्भ कुंभार समाज सुधार समिती महिला मंडळाच्यावतीने दिनांक 5 फेब्राुवारी, 2023 रोजी हुन्नर 2023 या सांस्कृतिक कार्यक्रमाचे भव्य आयोजन शहरातील संत गोरोबा काका सांस्कृतिक भवन, शशीनगर, बडनेरा रोड, अमरावती येथे करणयात आले आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्ह्राच्या खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी विदर्भ कुंभार समाज सुधार समितीच्या महिला अध्य़क्ष प्रभाताई भागवत, अर्चना खांडेकर, संगिता साळविकर, गौकर्णाबाई कोल्हे, प्रा. निर्मला नांदुरकर, सविता कोल्हे, प्रा. वैशाली नांदुरकर, विदर्भ कुंभार समाज सुधार समितीचे अध्यक्ष सुधाकर शेंडोकार, पंजाबराव काकडे, श्रीराम कोल्हे, भगवान जामकर, सुनिल भागवत अॅड. गजानन तांबटकर, सतिश गावंडे, सुरेंद्र सरोदे, प्रा. सुरेश नांदुरकर, अरूण पोहनकर यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमाच्या निमित्ताने खा. नवनीत राणा यांच्या हस्ते श्री संत गोरोबा काका स्मृतीव्दाराचे भूमिपूजन होणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विविध स्पर्धांचे आयोजनही करण्यात आलेले आहे. यामध्ये सकाळी 10.00 ते 11.00 रांगोळी स्पर्धा, फ्लॉवर डेकोरेशन, पाककला स्पर्धा होणार असून वैशाली सरोदे, वंदना काळकर, सविता काकडे, सविता कोल्हे, सुनिता धामणकर ह्रा या स्पर्धेच्या आयोजन प्रमुख असून लता कोल्हे, मंजिरी पाठक या स्पर्धेचे परीक्षण करतील. नृत्य स्पर्धेत 10 ते 15 वयोगट व 15 ते 20 या वयोगटात नृत्य स्पर्धा होईल. या स्पर्धेचे आयोजन प्रमुख सुषमा काळकर व संगीता साळविकर असून स्पर्धेचे परिक्षण शुभम माळेकर व गौरी राठी हे करतील. उखाणे स्पर्धेचे आयोजन प्रमुख म्हणून मंदा काळे, सुनंदा अंबुलकर व निर्मला नांदुरकर ह्रा असून या स्पर्धेचे परिक्षणही त्या करणार आहेत. संगित खुर्ची स्पर्धेचे आयोजन प्रमुख म्हणून मंदा पोहणकर, सुषमा काकडे व गौकर्णा कोल्हे ह्रा असून स्पर्धेचे परिक्षण करतील. बचाव स्पर्धेचे आयोजन प्रमुख निर्मला नांदुरकर व प्रांजली काळबांडे ह्रा असून स्पर्धेचे परिक्षणही त्या करणार आहेत. नृत्य स्पर्धेकरीता निवडलेले गाणे/ संगित स्पर्धकाने पेनड्राईव्हमध्ये आणावे, मोबाईलव्दारे स्वीकारले जाणार नाहीत. तसेच स्पर्धा सुरु होण्यापूर्वी स्पर्धकाने 15 मिनिटे आधी उपस्थित रहावे. स्पर्धेत भाग घेण्याकरीता नाव नोंदणीची अंतिम तारीख 1 फेब्राुवारी असून नाव नोंदणीकरीता स्पर्धकांनी आयोजकांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ऐनवेळी स्पर्धकाला स्पर्धेत भाग घेता येणार नाही.
मुख्य कार्यक्रमाचे संचालन प्रा. वैशाली नांदुरकर ह्रा करतील. नृत्य संचालन प्रांजली काळबांडे व स्वाती साळविकर, तर आभारप्रदर्शन वनिता गावंडे ह्रा करतील. या कार्यक्रमाचा समाजबांधवांनी मोठया संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन नंदा पोहणकर, मंदा काळे, सुषमा काळकर, वैशाली सरोदे, सौ. वनिता गावंडे, सुनंदा अंबुलकर, सुषमा काकडे, सविता काकडे, सुनिता धामणकर व प्रा. वैशाली नांदुरकर यांनी केले आहे.