महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नवनियुक्त सदस्यांनी घेतली शपथ

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी राज्यपालांकडून नियुक्त करण्यात आलेले डॉ. अभय एकनाथ वाघ आणि डॉ. सतीश माधवराव देशपांडे यांना आज आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला आयोगाचे सदस्य डॉ. प्रताप दिघावकर, सचिव डॉ. सुवर्णा खरात यांच्यासह आयोगाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अध्यक्ष निंबाळकर यांनी नवीन सदस्यांचे स्वागत करून त्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कामकाजाबाबतची माहिती दिली. मार्च 2023 पर्यंत सरळ सेवा आणि राज्य सेवा परीक्षांच्या मुलाखती पूर्ण करण्याचे लक्ष्य आयोगाने ठेवले असून याबाबतही निंबाळकर यांनी सदस्यांना माहिती दिली.

डॉ. दिघावकर यांनीही यावेळी नवीन सदस्यांना मार्गदर्शन केले.

NewsToday24x7

Next Post

राज्यातील सर्व बाल सुधारगृहात कौशल्यविकास केंद्र सुरू करणार - महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा

Fri Feb 3 , 2023
चिल्ड्रन एड सोसायटीचे डोंगरी येथील निरीक्षण गृह आणि मानखुर्द येथील बालगृह येथील कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन मुंबई : बालकांना शिक्षणासोबतच आवश्यक कौशल्य विकसित होण्यासाठी कौशल्य विकास विभाग आणि महिला व बालविकास विभाग प्रयत्नशील आहे. मुंबई येथील चिल्ड्रन एड सोसायटीचे डोंगरी येथील निरीक्षण गृह व मानखुर्द येथील बालगृह येथे नव्याने सुरू केलेल्या कौशल्य विकास केंद्राच्या धर्तीवर राज्यातील बाल सुधारगृहांमध्ये कौशल्यपूर्ण शिक्षणाचे […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com