नागपूर :- समाजाला कीर्तन -अभंगाच्या माध्यमातुन मानवता आणि लोककल्याणाची शिकवणी देणारे संत श्री. संताजी जगनाडे महाराज यांच्या 398 व्या जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने म.न.पा. केंद्रीय कार्यालयातील मुख्य दालनातील संत संताजी जगनाडे महाराज यांच्या तैलचित्राला उपायुक्त निर्भय जैन यांनी माल्यार्पण करुन विनम्र अभिवादन केले.
या प्रसंगी अमोल तपासे, कैलाश लांडे, संताजी नवयुवक मंडाळचे पदाधिकारी सुभाष घाटे, मंगेश सातपूते, विनोद डोंगरे, अतुल आकरे, गिरीश महाजन, शुभम लोहकरे, रुपेश कांबळे, अनिल राजूरकर, नरेन्द्र हटवार,विजय खनके, अनिकेत नांदूरकर, बंटी घनमारे, सुभाष ढबाले, प्रकाश कांबळे, हरीष महाजन, मोहन लांजेवार, संजय फटींग, कृष्णा सोनटक्के,निलेश वाघुळकर, प्रविण बावनकुळे, राकेश हटवार, राकेश मेहर, पंकज सावरकर, सुभाष तळस आदी उपस्थित होते.