स्थळ – बाल भवन, सुभाष रोड, नागपूर.
नागपूर :- महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक कृती समिती तर्फे १८ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर पर्यंत असा २३ दिवसाचा संप महाराष्ट्रातील सर्व आशा वर्कर व गटप्रवर्तक यांनी आपल्या विविध मागण्या करता केला. त्यानुसार नागपूर मध्ये सुद्धा आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सी आय टी यू) नागपूर तर्फे संविधान चौकामध्ये धरणे आंदोलन करत विविध प्रकारे प्रदर्शन करण्यात आले. नागरिकांच्या आरोग्यविषयक सेवेत असणाऱ्या व त्यांची काळजी घेणाऱ्या आशा वर्कर तसेच त्यांच्याकडून काम काढून घेणाऱ्या त्यांच्या सुपरवायझर (गटप्रवर्तक) यांचेवर शासन सतत दुर्लक्ष करीत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम करणाऱ्या आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना अल्प मोबदल्यामध्ये काम करावं लागतं. त्याकरता विविध मागण्या करता आंदोलन करण्यात आले होते. आरोग्य मंत्री- तानाजी सावंत, मुख्यमंत्री -एकनाथ शिंदे, विधान परिषदेचे उपाध्यक्ष -झिरवाड साहेब, अप्पर आरोग्य सचिव -मिलिंद म्हैसकर साहेब यांचे सोबत कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या सतत बैठका झाल्या. त्यानुसार आशा व गटप्रवर्तक बाबत सकारात्मक चर्चा करून त्यांनी खालील मागण्या मान्य केल्या व त्याचे तात्काळ परिपत्रक काढण्याचे त्यांनी आश्वासन दिले. परंतु आजपर्यंत असे कोणतेही पत्र मंत्रिमंडळाची बैठक घेऊन काढण्यात आले नाही. त्यामुळे १२ डिसेंबर रोजी नागपूर विधान सभेवर मोर्चा करण्याचे ठरविले आहेत.
!!मान्य करण्यात आलेल्या मागण्या !!
१) आशा वर्कर यांना मासिक ७ हजार रुपये व गटप्रवर्तक यांना मासिक १० हजार रु. मासिक मानधन देण्याचे मान्य केले.
२) आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना दिवाळी बोनस २ हजार रुपये.
२) आशा वर्कर यांना आरोग्यवर्धिनी चा मासिक निधी १००० रुपये निधी सरसकट सी एच ओ नसलेल्या जागी सुद्धा मेडिकल ऑफिसर च्या सहीने देण्यात यावा.
३) गटप्रवर्तकांना आरोग्यवर्धिनीचे मासिक १५०० रुपये देणार.
४) आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे प्रसूती रजा देणार.
५) आशा व गटप्रवर्तक यांना ऑनलाइन डाटा एन्ट्री ची सक्ती करणार नाही. ज्या आशा वर्कर किंवा गटप्रवर्तक ऑनलाईन चे काम करतील त्यांच्या मोबदल्यामध्ये वाढ करण्यात येईल.
६) आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना संप कालावधी मधील कामानुसार मानधन देण्यात यावे.
७) जे एस वाय अंतर्गत आशा वर्कर यांना बीपीएल लाभार्थ्यावर मोबदला दिला जातो परंतु ए पी एल असणाऱ्या लाभार्थ्यावर मोबदला दिले जात नाही त्यावर निर्णय घेताना एपीएल लाभार्थ्यावर सुद्धा मोबदला देण्याचे मान्य केले होते परंतु परिपत्रक काढण्यात आलेले नाही.
अध्यक्ष कॉ.राजेंद्र साठे महासचिव कॉ. प्रीती मेश्राम