– शिक्षण विभागाचे गलिच्छ नियोजन,मराठीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी प्रश्नपत्रिका
देवलापार :- शासनातर्फे सध्या पॅटची परीक्षा २२ ऑक्टोबर सुरु झाली असून अनेक विषयाच्या प्रश्नपत्रिकाच उपलब्ध नसल्याने परीक्षा कशी घ्यायची हा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आहे. रामटेक तालुक्यात सर्वच ठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
दिनांक 22 ते 25 ऑक्टोबर 24 दरम्यान ई 3 री ते 9 वी च्या विद्यार्थ्यांच्या PAT परीक्षा राज्य शासनाने आयोजित केली असून त्या परीक्षेच्या प्रश्न पत्रिका शासन स्तरावरून पुरविल्या जातात. परंतू रामटेक तालुक्यात ई 9 वी च्या गणित विषयाच्या मराठी माध्यमाच्या प्रश्न पत्रिका अद्याप अप्राप्त आहेत. या विषयाचे पेपर दिनांक 24 व 25 ऑक्टोबर ला होणार आहेत.
पूर्वानूभवानुसार शेवटच्या क्षणी दोन ते पाच प्रश्नपत्रिका दिली जातात व शाळेला झेरॉक्स करायला लावले जाते. त्याचा आर्थिक भुर्दंड शाळेवर बसतो. व त्यामुळे परिक्षेची गोपनियता भंग होते. परीक्षेची गोपनियता भंग होणे म्हणजेच त्या परिक्षेला अर्थच काय? अनेकदा प्रश्नपत्रिकेची झेरॉक्स काढतांना पालक वर्ग ही विचारतो.
उपरोक्त चुकीची बाब घडू नये म्हणून अनेकदा याबाबत मुख्याद्यापकांनी प्रश्न उपस्थित केले परंतू त्याकडे हेतूपुरत्सर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मुख्याद्यापकांनी केला आहे. शासन स्तरावर राबविण्यात येणाऱ्या परीक्षांच्या बाबतीत नेहमीच असे का होते. याबाबत मुख्याद्यापक वर्तूळात चर्चा रंगत आहे.याकडे लक्ष देण्याची मागणी रामटेक तालुका मुख्याद्यापक संघाने केली आहे.