अलंकार नगर येथे 65 हजाराची घरफोडी..

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 12:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या अलंकार नगर येथील एका कुलुपबंद घरातुन अज्ञात चोरट्याने अवैधरीत्या प्रवेश करून एम एच 40 ए पी 8262 क्रमाँकाची होंडा शाईन दुचाकी किमती 40 हजार रुपये,संसुई कंपनीची टीव्ही किमती 20 हजार रुपये,होम थिएटर किमती 5 हजार रुपये असा एकूण 65 हजार रुपयांची घरफोडी केल्याची घटना 10 ते 11 फेब्रुवारी दरम्यान घडली असून यासंदर्भात फिर्यादी गणेश खोब्रागडे वय 35 वर्षे रा अलंकार नगर येरखेडा कामठी ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी वरून अज्ञात चोरट्या विरुद्ध भादवी कलम 454,457,380 अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

@filephoto

Next Post

अंबाझरी धरणाच्या मातीबांध बळकटीकरणाची कामे   नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे विभागीय आयुक्तांचे निर्देश

Tue Feb 13 , 2024
नागपूर :- अंबाझरी धरणाच्या मातीबांध बळकटीकरणासाठी आवश्यक तिथे दुरुस्ती, पुनर्बांधणी व तत्सम कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिले. अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय समिती गठीत करण्यात आली […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com