भंडारा :- शिक्षण हे वघिनिचे दूध आहे , जो हे प्राशन करेल तो गुरगुरनारच ह्या बाबासाहेबांच्या उक्तिचा पुरेपुर संदर्भ सानिया ने दिला. नुकताच 12 वी सिबीएससी चा निकाल लागला यात जिल्ह्यातुन महर्षी विद्या मंदिर ची विद्याथीनी सानिया मंगेश नारनवरे हिने 96 टक्के गुण घेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला , तसेच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतुन , दोन खोल्यांच्या घरात राहून जिद्दीने दिवसाची रात्र करत अभ्यास करुन आई वडिलांच्या शिरात मानाचा शीरपेच रोवन्यात यशस्वी झाली. सानिया अभ्यासात अत्यंत तल्लख असल्याने ती 8 वी पासून च नवोदय विद्यालयात शिकली, परन्तु नीट च्या अभ्यासला वेल मिळत नसल्याने तिने महर्षि विद्यालयात प्रवेश घेतला व जिद्दीने अभ्यास करून यश सम्पादित केले त्यानिमित्त भंडारा शहरातील विविध पक्षातील प्रतिनिधी यांनी सानिया नारनवरे या मुलींनी बिकट परिस्थितीवर मात करत जिल्ह्यात प्रथम आल्याने सानिया चा सत्कार करत करत तिला पेठे देत पुढच्या वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या यात भाजपा महामंत्री तथा माजी उपाध्यक्ष आशु गोंडाने, रिपाई आ जिल्हाध्यक्ष असित बागड़े, डॉ बाबासाहेब आम्बेडकर सार्वजनिक जयंती समिति चे अध्यक्ष विनय बंसोड़, अजित बंसोड़, शरद खोब्रागडे, सूरज डोंगरे, तसेच सानिया चे वडील मंगेश राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम तथा आई अल्का व मोठे बाबा उपस्थित होते.