क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी २५ मे पासून ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई :- राज्य शासनाच्या वतीने शिक्षकांना दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त प्रातिनिधिक स्वरुपात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सन २०२२-२३ च्या या पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असून नाव नोंदणी दि.२५ मे २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून https://forms.gle/z5mw9A2dTu6J3zyNA या लिंकवर सुरू होणार आहे.

या पुरस्कारासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व मान्यताप्राप्त अनुदानित खाजगी प्राथमिक/माध्यमिक/ उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांनी दि. १५ जून २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे, असे आवाहन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक पुणे यांनी केले आहे.

NewsToday24x7

Next Post

देशातील वैशिष्ट्यपूर्ण अशा सुशासन नियमावलीस मुख्यमंत्र्यांची मान्यता प्रशासन अधिक उत्तरदायी, गतिमान होणार

Fri May 19 , 2023
मुंबई  :- देशातील वैशिष्ट्यपूर्ण अशा सुशासन नियमावली २०२३ ला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिल्याने राज्याचे प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शी होण्यास मदत होणार असून यात वातावरणीय बदलाच्या परिणामावरील कार्यवाहीसाठी स्वतंत्र कक्षाच्या निर्मितीचा देखील अंतर्भाव असणार आहे. राज्याचे प्रशासन उत्तरदायी, सुलभ, गतिमान आणि पारदर्शी व्हावे यासाठी स्थापन समितीच्या अहवालावर आज सह्याद्री अतिथीगृह येथे चर्चा करण्यात आली. सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com