‘लव्ह जिहाद’ विरोधी व ‘धर्मांतरबंदी’ कायद्यांच्या मागणीसाठी हिंदु जनसंघर्ष मोर्चा !

नागपूर :- महाराष्ट्रातील हिंदू तरुणी श्रद्धा वालकरचे 35 तुकडे करणारा धर्मांध आफताब आणखी 20 मुलींना फसवतो. ‘फाशी झाली तरी ‘जन्नत’ मध्ये 72 सुंदर ‘हूर’ मिळतील’, असे तो निर्लज्जपणे सांगतो. यातून ‘हे प्रेम नव्हे, तर षड्यंत्र आहे’, हे लक्षात येते. श्रद्धा वालकरचे प्रकरण शांत होत नाही, तोच झारखंड राज्यातील रबिका या हिंदू तरुणीचे दिलदार अन्सारी या धर्मांधाने 50 तुकडे केल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या ‘लव्ह जिहाद’मध्ये अजून किती हिंदु युवतींचा बळी जाऊ देणार ? ‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी उत्तर प्रदेश, कर्नाटक आदी अनेक राज्यांत ‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतरबंदी’ यांविषयी कठोर कायदे केले आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही कायदे झाले पाहिजेत !

या संदर्भात प्रत्येक जिल्ह्यात आंदोलने चालू आहेत. हिंदूंच्या मागण्यांची तीव्रता सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी नागपूर येथील विधान भवनावर 21 डिसेंबर या दिवशी ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’ काढण्यात येणार आहे. या मोर्च्यात संपूर्ण विदर्भासह महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातून संत, धर्माचार्य, संप्रदायाचे प्रमुख, हिंदू संघटना आणि विविध ज्ञाती समाज सहभागी होणार आहेत.

मोर्चा मार्ग : (प्रारंभ) यशवंत स्टेडियम, धंतोली – मुंजे चौक – तंत्र माध्यमिक शाळा – शनि मंदिर – माहेश्वरी भवन / फ्रिडम पार्क (शेवट) वेळ : दुपारी 12 ते 1.30 वा.; संपर्क : 9373536370

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वनविभागातील अनिल शेळके यांचा नागपूर येथे वनमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

Tue Dec 20 , 2022
भंडारा, दि. 20 : भंडारा वनविभागातील शीघ्र कृती दलात कार्यरत वाहनचालक अनिल शेळके यांना वन्यजीवांच्या संरक्षणात धाडसी व उत्कृष्ट कार्याबद्दल नुकतेच रजत पदक जाहीर झाले. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह नागपूर येथे आयोजित भव्य कार्यक्रमात ‘रजत पदक’ देऊन शेळके यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाला प्रधान सचिव (वने) बी. वेणूगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक(वनबल प्रमुख) वाय .एल. पी. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com