अहो, शेतकरी हीच आमची जात आहे… जात विचारून शेतकऱ्यांना खते काय देताय – अजित पवार

अजित पवार जातीच्या राजकारणावरुन सभागृहात आक्रमक…

मुंबई :- अहो शेतकरी हीच आमची जात आहे… खते खरेदी करताना शेतकऱ्याना जात कसली विचारताय असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला सभागृहात विचारला.

सांगली येथे रासायनिक खते खरेदी करताना जात विचारली जात असल्याचा मुद्दा अजित पवार यांनी उपस्थित केला व जातीवाद निर्माण करणार्‍या सरकारला चांगलेच खडेबोल सुनावले.

रासायनिक खते खरेदी करताना शेतकऱ्यांना जात का सांगावी लागत आहे. ती का नोंदवावी लागते आहे असा सवालही अजित पवार यांनी केली.

ई पॉस सॉफ्टवेअर मशीनमध्ये जातीचा रखाना टाकण्यात आला आहे. त्यात शेतकऱ्यांना जात सांगावी लागते आहे. त्यामुळे जातीचे लेबल लावण्याचा प्रकार पुरोगामी महाराष्ट्रात घडता कामा नये असेही अजित पवार यांनी खडसावून सरकारला सांगितले.

या प्रकरणात कनिष्ठ अधिकारी बळीचे बकरे ठरु नये. कोण यामध्ये सहभागी आहे त्याच्यावर कारवाई करावी आणि जातीचे लेबल बंद करावे व याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणीही अजित पवार यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आजनी येथे सावित्रीबाईंना अभिवादन व शिवरायांना मुजरा..

Fri Mar 10 , 2023
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 10 :- कामठी तालुक्यातील आजनी येथील सावित्रीबाई जोतीराव फुले अभ्यासिका आणि वाचनालयात शुक्रवार दिनांक १० मार्च २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांना तिथी प्रमाणे असलेल्या जयंती निमित्त मानाचा मुजरा करण्यात आला आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. प्रमुख अतिथी सरस्वती कॉन्व्हेन्टच्या मुख्याध्यापिका भारती वाट यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!