‘आईस गोला’च्या अतिरेकाने आरोग्याला धोका

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष

कामठी :- वाढत्या उन्हाच्या प्रकोपातून बचाव करण्यासाठी नागरिकांची शीतपेय तसेच इतर थंडपेय वस्तुसह ‘आईस गोला’ कडे आपला कल वाढविला आहे.यानुसार कामठी शहरात थंडपेय चे मोठमोठे कॅफे उघडले आहेत.उन्हाळ्यात नागरिकांची वाढती थंडपेय ची मागणी लक्षात घेता व्यावसायिकांनी नफा कमविण्याच्या दृष्टीने शीत वस्तूंचा ‘गोडवा’ वाढविण्यासाठी सर्रास सॅकरीन चा वापर करीत आहेत.त्यामुळे आईस गोला सारखे इतर थंडपेय घेणाऱ्या नागरिकांचे या सॅकरिन मुळे आरोग्य धोक्यात आले आहे.तर उन्हाळ्यात एकाही शीतपेय धारकाकडून नमुना न घेण्यात आल्याने येथील अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यकुशलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या पाऱ्याचा आलेख सारखा चढता आहे.त्यामुळे शहरातील रस्ते ऊन होण्याच्या आतच ओस पडत आहेत.दरम्यान बाजारपेठेसह इतर ठिकाणाहून येणारे प्रवासी उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी शितपेय, बर्फ गोळा, आईस्क्रीम,लस्सी यासारख्या वस्तुंना पसंती देतात .या शितपेयांची वाढती मागणी लक्षात घेता शीतपेय व्यावसायिक सर्रासपणे साखरे ऐवजी सॅकरिनचा वापर करीत आहेत.त्यामुळे शितपेयाचा गोडवा वाढत असला तरी केमीकलयुक्त सॅकरीनचे नागरिकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत आहेत.

शीतपेय तयार करण्यासाठी रंगासोबतच फळांचा इसेन्स आणि मुख्य घटक साखर वापरण्यात येते.मात्र साखरेच्या किमती दिवसेंदिवस गगनाला भिडत असल्यामुळे व त्यातच स्पर्धेमुळे स्वस्तात शीतपेय विकण्यासाठी व्यावसायिकांनी साखरेचा पर्याय शोधून काढला.जो साखरेच्या तुलनेत अतिशय अत्यल्प लागणाऱ्या सॅकरिनचा वापर वाढविला आहे.बर्फ, गोला, सरबत, लस्सी, आईस्क्रीम यासारख्या पदार्थामध्ये सॅकरिन वापराचा अतिरेक होत आहे परंतु अन्न व औषध प्रशासनाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असून शहरातील एकाही दुकानाचा नमुना घेतलेला नाही व कोणावर कारवाही केल्याचे ऐकिवात येत नसल्याने अन्न व औषध प्रशासनाकडे शंकेच्या नजरेने बघण्यात येत आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com