महानगरपालिका अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबीर

१६९ कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

चंद्रपूर – चंद्रपूर महानगरपालिका, श्रीमती विमलादेवी मेडीकल कॉलेज द्वारा संचालित आयुर्वेदिक व ॲलोपेथिक हॉस्पीटल चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन १ फेब्रुवारी रोजी मनपा राणी हिराई सभागृहात करण्यात आले होते.

आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराची सुरवात करण्यात आली.धकाधकीच्या जीवनामुळे‎ प्रत्येकाच्या जीवनात ताणतणाव‎ वाढला आहे. ही स्थिती आजारांना‎ निमंत्रण देणारी ठरत आहे. यापासून‎ दूर राहण्यासाठी संतुलित आहार,‎ नियमित व्यायाम करा. तणावमुक्त‎ जीवन जगण्याचा सल्ला आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिला.

सकाळी १० ते ६ या वेळेत आयोजीत करण्यात आलेल्या या शिबिरात १६९ अधिकारी कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, डॉ. नयना उत्तरवार, डॉ. अश्विनी भारत, डॉ.विजया खेरा,डॉ.नरेंद्र जनबंधु, डॉ. अतुल चटकी यांनी प्रयत्न केले.

या केल्या तपासण्या – ‎आयुर्वेदिक व ॲलोपेथिक हॉस्पीटल येथील डॉ.‎तुषार जोगे, डॉ.विनोद गणोर,डॉ.मुरके, डॉ.प्रदीप पाटील‎ या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चंद्रपूर महानगरपालिका अधिकारी‎ व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय‎ तपासणी केली. यात संपूर्ण आरोग्य तपासणी, रक्त तपासणी, ECG, रक्तदाब,‎ मधुमेह तपासणी यांचा समावेश होता.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शेजारी राज्याला मिळाले आमच्या महाराष्ट्राला मिळत नाही याचे शल्य मात्र महाराष्ट्रातील जनतेला कायम राहिल - जयंत पाटील

Thu Feb 2 , 2023
महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी या बजेटने काय दिले असा प्रश्न राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी केंद्राला विचारावा… शेतकरी उत्पन्न डबल करण्याचे लांबच राहिले दीड टक्क्यांनी दरवर्षी खालावले आहे… २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरकुल ;मग मुदतवाढ का? घरकुलासाठी देशातील जनता कासावीस आहे त्यांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचे काम केले आहे… सगळ्या योजनांना पंतप्रधानांचे नाव द्यायचे आणि फक्त पंतप्रधानांची छबी देशाच्या कानाकोपऱ्यात पोचवायची याच्यापलीकडे या बजेटचा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com