नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी आरोग्य शिबिर 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :-महाराष्ट्र शासन बांधकाम कामगार महामंडळच्या वतीने बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबा करिता निशुल्क आरोग्य तपासणी शिबिरा चे आयोजन आज आनंद नगरातील समाज भवनात करण्यात आले होते.

शिबिरात नोंदणीकृत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबीयांची तपासणी करण्यात आली.

शिबिराचे उदघाटन भाजप शहराध्यक्ष चंद्रशेखर तुप्पट यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजपा पदाधिकारी लालसिंग यादव, उज्वल रायबोले,विजय कोंडुलवार, विक्की बोंबले, दिनेश शरण, अमोल मानवटकर, शानु ग्रावकर, मोहम्मद अशफाक प्रामुख्याने उपस्थित होते.

बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे आरोग्य शिबिर समन्वयक आदित्य गवई यांनी तपासणीत गंभीर आजार वा लक्षण आढळल्यास बांधकाम कामगाराचा उपचार महामंडळ द्वारे निशुल्क करण्यात येतो अशी माहिती दिली.

शिबिराच्या यशस्वीते साठी संपतराव खोब्रागडे, बालकदास सिंगाड़े, पांडुरंग रामटेके,रोहित मेश्राम, प्रज्वल सोलंकी, निमिश सांगोड़े, निलेश सकतेल, रितेश चंद्रिकापुरे, हर्षल आमधरे, करण ग्रावकर,आदित्य जगनीत, सुनील हजारे,बिरजू चहांदे, अवि गायकवाड़ यांनी सहकार्य केले

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

17 डिसेंबर : दोन महापुरुषांची प्रथम भेट

Sat Dec 16 , 2023
नागपूर :- कोल्हापूरचे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील निवासस्थानी (बीआयटी चाळ क्र.1, खोली क्र. 50, 51, परळ, मुंबई) जाऊन स्वतः भेट घेतली. या दोन महापुरुषांची ही प्रथम भेट 17 डिसेंबर 1919 रोजी झाली. त्या प्रथम भेटीच्या स्मृती प्रित्यर्थ नागपूर जिल्हा बसपाच्या वतीने काही हम भूल न जाये या अभियानांतर्गत उद्या 17 डिसेंबर रोजी सकाळी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com