येरखेड्यात सरपंच पदावरून राजकारण तापले

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

-सरपंच पदी कुणाची वर्णी लागणार?कांग्रेसप्रणित सरिता रंगारी की भाजपप्रणीत राजकीरण बर्वे

कामठी ता प्र 11:– कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या 27 ग्रामपंचायतीची निवडणूक येत्या 18 डिसेंबरला होणार असून या निवडणुकीत थेट जनतेतून सरपंच पदाची निवड होणार आहे. यानुसार नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रा प मानल्या जाणाऱ्या येरखेडा ग्रा प सरपंच पदासाठी अनुसूचित जाती खुला प्रवर्ग आरक्षित असल्याने माजी जी प सदस्य सरिता रंगारी ,माजी ग्रा प सदस्य राजकीरण बर्वे सह इतर तीन उमेदवार असे एकूण पाच उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी सरिता रंगारी व राजकीरण बर्वे या दोघातच काट्याची लढत दिसून येत आहे. सरपंच पदासह सदस्य पदासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी येरखेडा गावात प्रचार धुमाळीला सुरुवात झाली आहे तसेच राजकिय हालचालींना वेग आल्याने येरखेडा गावात वातावरण तापू लागले आहे. त्यानुसार येरखेडा ग्रामपंचायतच्या थेट जनतेतून सरपंच पदासाठी होणारी निवडणूक ही चांगलीच गाजत आहे तर या स्थितीत कांग्रेसप्रणित उमेदवार असलेल्या माजी जी प सदस्य सरिता रंगारी यांचा मूलगा हा सुमेध रंगारी पंचायत समिती सदस्य आहे तसेच मागील निवडणुकीत कांग्रेस ने तिकीट न दिल्याच्या रागातून सरिता रंगारी यांनी कांग्रेसचे उमेदवार माजी सरपंच मंगला मनीष कारेमोरे यांच्या विरोधात कांग्रेसशी बंडखोरी करून निवडणूक रिंगणात उतरले होते .तरीसुद्धा मतदारांनी सरिता रंगारी याना नाकारून मंगला कारेमोरे यांना निवडुन आणले होते यावरून मतदारांनी एकाच घरातील सदस्यांना सर्वच जवाबदारी द्यायच्या का?अशी विचारसरणी केले आहेत त्यामुळे सरिता रंगारी ह्या आता कांग्रेस प्रणित उमेदवार असल्या तरी नागरिकांचा कल भाजप प्रणित तरुण तडफदार उमेदवार राजकीरण बर्वे यांच्याकडे दिसून येत आहे.तरीसुद्धा निकाल ठरवेल …मतदारांचा कौल कुणाला?सरपंच पदी सरिता रंगारी की राजकीरण बर्वे हे निकाला नंतरच कळणार आहे .

कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीचा निवडणुकीचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानुसार येरखेडा गावात राजकीय हालचालींना वेग आला आहे त्यातच सरपंच पदाची निवड ही थेट जनतेतून होणार असताना ग्रामपंचायत सदस्यपदासह सरपंच पदाच्या निवडणुकीची मोर्चेबांधणी झाली आहे.जनमताचा कौल घेण्यात येत आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून तालुका राजकारणात राजकीय वर्चस्व राखले जात असल्याने या निवडणुकीसाठी कांग्रेस ,राष्ट्रवादी कांग्रेस, भाजपा, शिवसेना,वंचित बहुजन आघाडी ,एमआय एमआयएम ,आदी पक्षाची मंडळी ही प्रत्यक्षरीत्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सक्रिय झाली असून होणाऱ्या निवडणुकीत जास्तीत जास्त ग्रामपंचायत वर्चस्व राखण्यासाठी विविध राजकीय पक्षाच्या मंडळीसाठी आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे.सरपंच पदासाठी सक्षम व योग्य उमेदवारांच्या निवडीसाठी सर्वच पक्षाचे नेते मंडळी कामाला लागली आहे त्यानुसार येरखेडा ग्रा प चे सरपंच पदाचे आरक्षण हे अनुसूचित जाती साठी आरक्षित असल्याने कांग्रेसप्रणित उमेदवार सरिता रंगारी तर भाजप प्रणित उमेदवार म्हणून राजकीरण बर्वे यासह इतरही उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी कांग्रेस व भाजप पक्ष ऍक्शन मोड मध्ये आले आहेत.

कोणत्याही परिस्थितीत सरपंच पदी आपल्या कार्यकर्त्यांची वर्णी लागावी यासाठी कंबर कसण्यात आली आहे.सरपंच पदाची निवडणूक ही थेट जनतेतून होत असली तरी सर्वांगीण विकास साधला जावा या हेतूने ग्रामपंचायत सदस्य पदालाही महत्व आहे .त्यामुळे सरपंच पदाबरोबर ग्रामपंचायत सदस्य पदाचे होणारी ही निवडणूक पक्षांतर्गत गावातील दोन गटांतर्गत काट्याच्या लढतीचे होणार आहे.त्यानुसार भाजपप्रणित उमेदवार राजकीरण बर्वे यांना दोन आमदार चंद्रशेखर बावनकुळे,व टेकचंद सावरकर, भाजप पदाधिकारी अनिल निधान,माजी सरपंच मंगला कारेमोरे, माजी सरपंच मनीष कारेमोरे , तसेच कांग्रेसचे काही बडे नेते सुद्धा राजकीरण बर्वे शी असलेल्या व्यक्तिगत संबंधामुळे राजकारण बाजूला सारून अप्रत्यक्ष मदत करणार आहेत तर सरिता रंगारी यांनी सांम ,दाम ,दंड ,भेद सर्व उपयोगात आणल्या तरी यांचा पराभव नक्की होणार असल्याच्या चर्चेला उत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा-वीरेंद्र मेश्राम

Sun Dec 11 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 11:- मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागनी संमता सैनिक दल चे वीरेंद्र मेश्राम यांनी केले आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले,कर्मवीर भाऊराव पाटील,यांनी भीक मागून शाळा काढली असे वादग्रस्त विधान केले आहे.गेल्या काही दिवसात सध्याच्या मंत्रिमंडळातील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com