माधवबागच्या भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– शेकडो च्या वर नागरिकांनी घेतला मोफत आरोग्य निदान शिबिराचा लाभ..

कामठी ता प्र 8 – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने माधवबाग , दैनिक देशोन्नती च्या संयुक्त विद्यमाने आज सोमवार 8 ऑगस्ट ला सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत कामठी येथील पोरवाल पार्क स्थित स्व.राजीव गांधी सभागृहात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचा शेकडो च्या वर नागरिकांनी लाभ घेतला असून शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला.

या शिबिराचे उदघाटन माजी जि प अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या हस्ते भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दिपप्रज्वलन करून करण्यात आले. याप्रसंगी प्रजापिता ब्रह्मकुमारी प्रेमलता दीदी,वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल शिरे,कामठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष अजय कदम, माजी उपाध्यक्ष काशीनाथ प्रधान, कामठी तहसील निवडणूक विभागाचे अधिकारी सत्यजित चंद्रिकापुरे, देशोन्नतिचे नागपूर शाखा व्यवस्थापक लक्ष्मीकांत संगवई , माधवबाग हॉस्पिटल कोंढाळी चे प्रसिद्ध आरोग्यतज्ञ गौरव शेळके,वरिष्ठ अधिकारी प्रशांत ठाकरे , दिपंकर गणवीर, अनिल पाटील, प्रतीक पडोळे,आशिष मेश्राम,नागसेन गजभिये,राकेश कनोजिया, अविनाश भांगे,उदास बन्सोड, दिनेश पाटील,राजेश गजभिये आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते .या शिबिरात मोफत तपासणी अंतर्गत नागरिकांची ईसीजी, बीपी, आरबीएस, बीएमआय,एसपीओ 2, तसेच हृदयरोग संबंधित रोगाची तपासणी करण्यात आली तसेच आरोग्य विषयक व्याख्यान करीत मार्गदर्शन करण्यात आले.

याप्रसंगी शिबिराचे उदघाटक माजी जि प अध्यक्ष सुरेश भोयर यांनी सांगितले की आजच्या स्पर्धात्मक युगातील धावपळीच्या जीवनात बदलती जीवनशैली , खाण्यापिण्याची बदललेली पद्धत व अनियमित आहारामुळे मानवी जीवनात विविध रोगांनी घर करून बसले असून अकाली मृत्यूचे प्रमाण वाढीवर आहेत.तेव्हा शरिराची काळजी घेणे हे सर्वांचे मानवी कर्तव्य आहे.कारण ‘जान है तो जहाँ है.. मानवी शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव म्हणजे हृदय, व्यायामाचा अभाव, चुकीच्या आहारामुळे तसेच मधुमेह , उच्च रक्तदाब, अतिरिक्त वाढलेली चरबी यामुळे हृदयरोगाचा धोका वाढत आहे.यावर वेळेवर निदान आणि उपचार केल्यास हृदयरोगाचा मोठा धोका टाळता येतो. तसेच उपस्थित मान्यवरानीही समयोचित असे मार्गदर्शन केले.

हे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीर यशस्वीरीत्या पार पडले असून या शिबिरासाठी कामठी नगर परिषद ने सभागृहाची विशेष व्यवस्था करून दिली होती तर शिबिराच्या यशस्वीतेसाठी माधवबाग चे डॉ गौरव शेळके, प्रशांत ठाकरे व आरोग्य चमू तसेच दैनिक देशोन्नतीचे शाखा व्यवस्थापक लक्ष्मीकांत संगवई व कामठी तालुका प्रतिनिधी संदीप कांबळे यांनी मोलाची कामगिरी राबविली.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!