हल्दीरामला महिला सेनेचा आक्रमक दणका..

नागपूर – नागपूर येथील हल्दीराम (मेडिकल चौक) स्वीट ह्या विक्री केंद्रावर मराठी भाषेचा वापर न करता इंग्रजी भाषेचा वापर करून राज्यभाषा मराठीचा अवमान होत आहे. हे निदर्शनास येताच महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना नागपूर शहर महिला आघाडीच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष अचलाताई मेसन, महिला शहर अध्यक्षा सौ.मनीषा पापडकर ह्यांच्या नेतृत्वात सर्व महिला आघाडीच्या मंसैनिकानी तीव्र शब्दांत आक्षेप नोंदविला. संबंधितांना तसे निवेदन देण्यात आले. शेवटी मनसेच्या प्रयत्नांना यश आले आणि हल्दीराम विक्रेता व्यावसायिकाने लवकरच मराठी भाषेचा वापर करण्याचे मान्य करून लेखी पत्र दिले व नागपूरमध्ये सर्व हल्दीराम प्रतिष्ठानमध्ये मराठी पाट्या लागणार व मराठी भाषेचा मान सन्मान होणार असे आश्वासन व्यवस्थापक यांनी दिले. हल्दीराम प्रतिष्ठानमध्ये जबरदस्त बंदोबस्त पोलिसांतर्फे लावण्यात आलेला होता. पोलिसांनी सुद्धा आम्हाला मोलाचे सहकार्य केले व या यशामध्ये आमच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अचला मेसन,शहराध्यक्ष सौ. मनीषाताई पापडकर अर्चनाताई कडू (शहर सचिव) मंजुषाताई पानबुडे (विभाग अध्यक्ष दक्षिण) मनीषा पराड (जनहित कक्ष) वैशाली फुलझेले विभाग उपाध्यक्ष पश्चिम बोरकुटे, अनु सहारे, सुनिता महाराष्ट्र सैनिक राज बहिर नागपूर शहरामधील सर्वच मनसैनिक महिला आघाडीतील कार्यकर्त्यांचे मनसे अभिनंदन !

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

‘खरा तो एकची धर्म’ मधून सर्वांना आपले म्हणून वागणूक देणाचा संदेश : महापौर दयाशंकर तिवारी

Sat Dec 25 , 2021
– साने गुरूजी जयंती निमित्त कार्यक्रम नागपूर : लहानपणापासून साने गुरूजींची ‘खरा तो एकची धर्म’ ही प्रार्थना आपण म्हणत आहोत. पुढे बदलत्या काळानुसार या प्रार्थनेतील ओळींचा अर्थ कळू लागला. सर्वधर्माचा भाव हा मानव सेवा आहे. धर्म कुठलाही असो प्रत्येकाला आपले समजून त्यांच्याप्रती आपल्या दायित्वाचे निर्वहन करण्याचा संदेश साने गुरूजींच्या ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ या प्रार्थनेतून येतो, असे प्रतिपादन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com