पावसाने वाढला गारवा

बेला :- मंगळवारला सकाळी झालेल्या पावसामुळे वातावरणात थंडीचा गारवा वाढला. त्यामुळे रात्री घातलेले स्वेटर व कानावरील उबदार वस्त्र लोकांनी दिवसभर काढलेच नाही. अवकाळी पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांचा शेतातील झाडाच्या बोंडावरील कापूस ओला झाला. त्यामध्ये नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते. झोप झाल्यानंतर सकाळपासून वातावरणात अनपेक्षितपणे हवामान बदल झाला. आणि हळूहळू सुरू झालेला पाऊस दुपारी बारा वाजेपर्यंत वाढत गेला. त्यामुळे आवागमन व जनजीवन ठप्प पडले. प्रवासी नसल्यामुळे अनेक बसेस रिकाम्या गेल्या. बाजारपेठेत ग्राहकांचा शुकशुकाट झाला. वाऱ्यासह पाऊस पडल्यामुळे काही भागातील वीज यंत्रणा खंडित झाली होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी अन्यथा शिवसेना स्टाईल ने आंदोलन करण्यात येईल- देवेंद्र गोडबोले (शिवसेना जिल्हाप्रमुख नागपूर)

Wed Nov 29 , 2023
नागपूर :- दोन दिवसा पासून सतत सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यावर आज मरण्याची वेळ आली परंतु शासनाने नियोजित केलेल्या पीक विमा ची तक्रार अप्लिकेशन काम करत नाही. तक्रार नोंदविता येत नाही. टोल फ्री क्रमांक काम करत नाही. लवकरात लवकर पंचनामा होणे गरजेचे आहे. विमा कंपन्या लक्ष देत नसून शासनाने तात्काळ लक्ष देऊन कारवाई करणे गरजेचे आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com