खैरी गावात लाल तोंडया माकडांचा हैदोस

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– गावात पसरली माकडांची दहशत

कामठी :- मागील काही दिवसांपासून कामठी तालुक्यातील खैरी गावात 200 च्या जवळपास लाल तोंडया माकडांनी घर करून बसले असून लोकांचा चावा घेणे, साहित्याची नासधूस करणे हे नित्याचेच झाले आहे.या प्रकारामुळे गावात या लाल तोंडया माकडांची दहशत पसरली असून गावात भीतीमय वातावरण पसरले आहे.

तेव्हा वनविभागाने ही बाब गांभीर्याने लक्षात घेता गावात असलेल्या या उपद्रवी लालतोंडया माकडांना जेरबंद करून त्यांची योग्यरीत्या विल्हेवाट लावावी अशी मागणी खैरी ग्रामपंचायत च्या सरपंच योगिता किशोर धांडे यांनी वनविभाग नागपूर चे वनसंरक्षक अधिकारी कडे केलेल्या निवेदनातून केले आहे.

या लालतोंडया माकडांनी गावातील 10 ग्रामस्थांचा चावा घेऊन जख्मि केले आहेत तसेच अनेक लहान मुले व महिलांना चावा घेण्याच्या प्रयत्न केला आहे.यासंदर्भात 11 जानेवारी ला संबंधित वनविभागाला निवेदित करून सद्यस्थितीची जणीव करून दिली होती मात्र संबंधित वनविभागाने या निवेदनाला केराची टोपली दाखवून अक्षम्य दुर्लक्ष केले तेव्हा या लालतोंडया माकडांचा चावा कुणाच्या जीवावर बेतणार तेव्हा या वनविभागाला त्यांच्या कर्तव्याची जाणीव होईल का?असा प्रश्न सरपंच योगिता धांडे यांनी केला आहे.तेव्हा संबंधित वनविभागाने लवकरात लवकर या लालतोंडया माकडांना जेरबंद करून योग्य ती विल्हेवाट लावावी अशी मागणी करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शिक्षक भरतीची अखेर जाहिरात प्रसिद्ध आमदार सुधाकर अडबाले यांच्या सभागृहातील पाठपुराव्‍याला यश

Tue Feb 6 , 2024
– राज्यात शिक्षकांची २१ हजार ६७८ पदे भरली जाणार नागपूर :- राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी पावसाळी अधिवेशनात २५ जुलै २०२३ रोजी तारांकित प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देताना शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी १५ ऑगस्ट २०२३ पासून राज्यात पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होईल असे सभागृहात सांगितले. मात्र, प्रत्यक्षात शिक्षक भरती […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com