विविध संमस्येसंदर्भात आढावा सभा संपन्न

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी ता प्र 22:-बिडगाव आणि तरोडी खुर्द वासियांच्या समस्या सोडविण्यासाठी विशेष बैठक आज ग्रा.पं. बिडगाव येथे प्रा.अवंतिकाताई रमेश लेकुरवाळे सत्तापक्ष नेता तथा सदस्य जि.प. नागपूर आणि आशिष मल्लेवार उपसभापती पं.स. कामठी यांच्या नेतृत्वात आढावा सभा घेण्यात आली. बिडगाव तसेच तरोडी खुर्द मध्ये मागील काही दिवसांपासून नळाच्या पाईप लाईनचे व नळ कनेक्शन चे काम सुरू आहे. यामध्ये नागरिकांना अनेक अडणीचा सामना करावा लागत होता. आणि या व्यतिरिक्त नागरिकांच्या अनेक समस्या समजून प्रा.अवंतिकाताई रमेश लेकुरवाळे यांनी समस्यांचे निराकरण केले. प्रसंगी उपस्थित कानडे सर उपविभागीय अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग नागपूर, निकेशजी कातुरे सरपंच, ग्रा.पं. सदस्य वैशालीताई कोकुर्डे, ग्रा.पं. सदस्य मनिशाताई कुमरे, सचिव एन.एल.बोंद्रे आणि बिडगाव, तरोडी खू. समस्त नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

येरखेडा ग्रामपंचायत कार्यालय जागतिक योग दिन कार्यक्रमाचे आयोजन

Wed Jun 22 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी – कामठी तालुक्यातील येरखेडा ग्रामपंचायत कार्यालय परिसरात जागतिक योग दिनाचे पर्वावर योग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते जागतिक योग दिन कार्यक्रमाची सुरुवात येरखेडा ग्रामपंचायतचे सरपंच मंगल कारेमोरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी योगतज्ञ पोर्णिमा कावळे ,सुषमा राखडे, वंदना भस्मे, वैशाली भांडारकर ,नीलिमा मोरघडे ,उर्मिला बाहेकर ,उर्मिला गड्रे ,कांचन इंगोले ,मीना अग्रवाल ,वैशाली खोब्रागडे, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights