संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यातील आजनी येथे कामगार कवी लिलाधर दवंडे संचालित निःशुल्क अभ्यासिका आणि वाचनालयात सोमवार दिनांक ३ जुलै रोजी गुरू पौर्णिमा निमित्त ग्रंथ हेच गुरू समजून ग्रंथ पूजन करण्यात आले.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना लिलाधर दवंडे यांनी गुरू आणि गुरू पौर्णिमा तसेच आयुष्यातील ग्रंथांचे, पुस्तकांचे महत्त्व समजावून सांगितले.
या प्रसंगी राहूल ढोक, राजकुमार दवंडे, मृणाल वाट, प्रियांका घोडे, तनुश्री हिवरकर, तनुश्री शेंडे, अंकित जेवडे, सृष्टी दवंडे, कार्तिक दवंडे आदींची उपस्थिती होती.