दिवाळीच्या दिवशी १७ ठिकाणी आगीच्या, घटना अग्निशमन विभागाच्या तत्परतेने अनर्थ टळला

नागपूर :- दिवाळीच्या दिवशी १२ नोव्हेंबर रोजी नागपूर शहरातील विविध १७ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. घटनांची माहिती मिळताच नागपूर महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या अग्निशमन केंद्रांवरील पथकांनी तत्परतेने बचावकार्य केल्याने मोठा अनर्थ टाळता आला. मनपाच्या अग्निशमन जवानांच्या कार्याचे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी कौतुक करीत पथकाचे अभिनंदन केले. मुख्य अग्निशमन अधिकारी बी.पी. चंदनखेडे यांच्या मार्गदर्शनात वेगवेगळ्या अग्निशमन केंद्रावरील स्थानक अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात हे बचावकार्य पार पाडण्यात आले.

विशेष म्हणजे, सर्व आगीच्या घटना या रात्रीच घडलेल्या आहेत. मनपाच्या नियंत्रण कक्षाकडे नोंदविण्यात आलेल्या घटनांनुसार, कॉटन मार्केट अग्निशमन केंद्रांतर्गत गणेशपेठ साखरे गुरूजी शाळेजवळ घराला आग लागल्याची सूचना प्राप्त होताच स्थानिक पथकाने तात्काळ बचावकार्य करीत आगीवर नियंत्रण मिळविले. या घटनेमध्ये अंदाजे १ लाखाचे नुकसान झाले तर पथकाच्या तत्परतेमुळे सुमारे १० लाखांचे नुकसान होण्यापासून वाचविण्यात यश आले. सोनेगाव येथील ममता हाऊसिंग सोसायटीमध्ये कचऱ्याला लागलेली आग विझवून त्रिमूर्तीनगर पथकाने २५ हजारांचे नुकसान होण्यापासून वाचविले. लकडगंज अग्निशमन केंद्रांतर्गत जुना बस स्टँड लकडगंज चौकी नं १० च्या समोर अनाज बाजार इतवारी येथे घराला आग लागली. स्थानिक पथकाने आग विझवून सुमारे ५० लाखांचे नुकसान होण्यापासून वाचविले. या घटनेत २५ हजारांचे नुकसान झाले. नटराज चौक झेंडा चौक केंद्रीय वि‌द्यालय शाळेमध्ये अज्ञात कारणाने आग लागल्याची माहिती मिळताच तात्काळ लकडगंज अग्निशमन केंद्राचे पथक घटनास्थळी पोहोचले. पथकाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळविले. या घटनेत अंदाजे ९० हजार रुपयांचे नुकसान झाले तर पथकाच्या तत्परतेने सुमारे ५ लाख रुपयांचे नुकसान होण्यापासून वाचविता आले. नंदनवन हसनबाग येथील जवाहर विद्यालय गॅरेजमध्ये आग लागल्याची माहिती मिळताच सक्करदरा पथक घटनास्थळी पोहोचले. पथ्काने आग विझवून सुमारे २० लाखांचे नुकसान होण्यापासून वाचविले. या घटनेत अंदाजे १५ हजार रुपयाचे नुकसान झाले.

लकडगंज स्थानक पथकाने कच्छीविसा भवन इमारतीमध्ये लागलेली आग विझवून सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान होण्यापासून बचाव केला. या घटनेत अंदाजे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले. दक्षिणामूर्ती चौक येथे एका घरामध्ये लागलेली आग विझवून गंजीपेठ स्थानकाच्या पथकाने सुमारे १० हजार रुपयांचे नुकसान होण्यापासून बचाव केला. शिवाजी नगर गांधी नगर स्कूल जवळ एनआयटी कॉम्प्लेक्सच्या पाचव्या माळ्यावर आग लागल्याची घटना घडली. त्रिमूर्ती नगर स्थानक पथकाने संपूर्ण इमारतीला आगीमुळे निर्माण होणारा धोका टाळण्याच्या दृष्टीने बचाव कार्य केले. या घटनेत मोठी हानी टाळता आली. या आगीमध्ये अंदाजे २५ हजारांचे नुकसान झाले. सक्करदरा अग्निशमन केंद्रांतर्गत हनुमान नगर चौकोनी उद्यान परिसरात एका घराला आग लागली. अग्निशमन पथकाने वेळीच आग विझवून सुमारे १५ हजार रुपयांच्या नुकसानीची बचत केली.

याशिवाय भोले पेट्रोल पम्प म्हाडा कॉम्प्लेक्स जवळ, वैशाली नगर मैदानाजवळ, पिवळी नदी परिसरामध्ये, हरी नगर मानेवाडा चौक, फुटाळा तलाव वायूसेना नगर, नारायणपुरी सेंट्रल जेल समोरील रुम, सुभाष नगर शितला माता मंदिरच्या बाजुला, शंकर नगर दांडी गेट लेआऊट अॅल शोरुम घरावरील झाड अशा विविध ठिकाणी लागलेली आग स्थानिक अग्निशमन केंद्रांच्या पथकांनी विझवून मोठे नुकसान होण्यापासून बचाव केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ऐन दिवाली दिन आदिवासीयों के घर आग में भस्मसात

Tue Nov 14 , 2023
– घुबडी गांव की घटना – साढ़े तीन से चार लाख की हानी काटोल :- ऐन दिवाली की लक्ष्मी पूजा के दिन, काटोल तालुका के आदिवासी गांव घुबड़ी के आदिवासियों के घरों में आकस्मिक आग लगने से यहाँ के दो आदिवासीयों माकान आग पुर्णतः जल कर खाक हो गया. जिसमें घर में रखा संपूर्ण सामान आग के भेट चढ गया. इस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com