महालगावा-मुरदाडा अपघात प्रकरण पेटले

अमरदिप बडगे

पोलिसांना मारण्याचा व पोलिस निरीक्षकांची गावकऱ्यांनी काढली बंधुक व्हिडिओ झाला वायरल

गोंदिया :- गोंदिया जिल्ह्याच्या ग्राम महालगाव-मुरदाडा येथे अवैधरित्या वाळू तस्करी करणारा टिप्पर व ट्रॅक्टर यांचा विचित्र अपघात बुधवार, 15 जून रोजी झाला. यात ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले.
https://youtube.com/shorts/2KPlAf1sLI8?feature=share

असुन त्यापैकी पुन्हा एकाचा मृत्यू झाला. गुरुवार, 16 जून रोजी दूसरा मृतदेह आणून गावातील बाजार चौकात ठेवून ग्रामस्थांनी चक्काजाम आंदोलन सुरू केले.

या दरम्यान हजारोच्या संख्येने लोकांची उपस्थिती होती. प्रकरण एवढे तापले होते की गावकऱ्यांनी पोलिसांना मारहाण केली पोलिसांची गाडी फोडली तर पोलिस निरीक्षक प्रतापराव भोसले यांना मारत त्यांची बंदूक गावकऱ्यांनी काढून घेतली असून त्याचा व्हिडीओ वायरल झालेला आहे.

 

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com