नागपूर :- रविंद्रकुमार सिंगल पोलीस आयुक्त, नागपुर शहर, सह पोलीस आयुक्त नागपुर शहर, अश्वती दोरजे यांचे मार्गदर्शनात पोलीस आयुक्तालय, पोलीस भवन येथील ऑडीटोरीयम हॉल येथे आज दिनांक २२. ०६.२०२४ ये ११.०० वा. पोलीस अधिकारी व अंमलदार यांना नविन कायद्यांचे मार्गदर्शन प्रशिक्षणपर सेमीनारचे आयोजन करण्यात आलेले होते. नमुद सेमीनारमध्ये हजर असलेल्या अधिकारी व अंमलदार यांना नविन कायदे भारतीय न्याय संहीता, भारतिय नागरिक सुरक्षा संहीता व भारतीय साक्ष अधिनियम याबाबत अवगत करून मार्गदर्शन करण्यात आले. सेमीनारमध्ये चाणक्य किणे, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिवर्सीटी, नागपुर यांनी उपस्थीतांना नविन कायद्यांबाचत सविस्तर माहीती देवुन, जुन्ऱ्या व नविन कायद्यातील कलमामध्ये झालेले बदल आणि कार्यवाही याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच, प्रत्यक्षात काम करतांना नविन कायद्यानुसार घ्यावयाची काळजी, दक्षता ईत्यादी बाबत सुध्दा आवश्यक सुचना देवुन सविस्तर मार्गदर्शन केले. सेमीनारमंध्ये नागपुर शहर पोलीस दलातील सर्व पोलीस ठाणे व शाखा येथील अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने हजर होते.