महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाकडूनमुंबईतून एकाला अटक 

मुंबई दि 17 ; महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाकडून केलेल्या अन्वेषणात मुंबई येथून अत्ताउल्हा मोहम्मद नईम चौधरी या व्यक्तीस अटक करण्यात आली असल्याची माहिती राज्यकर उपआयुक्त (जनसंपर्क) यांनी दिली आहे. महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाकडूनकेलेल्या अन्वेषणातून असे निदर्शनास आले, श्री. अत्ताउल्हा मोहम्मद नईम चौधरी नामक व्यक्तीने में. गौरी इस्पात, मे तेज स्टील, मे गजानन एंटरप्रायझेस, या नावेमहाराष्ट्र वस्तू व सेवाकर कायदा, 2017 अन्वये नोंदणी करून GSTIN क्रमांक प्राप्त केले आहेत. ही नोंदणीकृत व्यापारी संस्था प्रत्यक्ष खरेदी वा विक्रीव्यवहार न करता मोठ्या प्रमाणावर खोटी बिजके / देयके स्वीकारत व निर्गमित करत असल्याचे दिसून आले. श्री. अत्ताउल्हामोहम्मद नईम चौधरी यांनी विविध कंपन्यांकडून रु. 105 कोटी इतक्या रक्कमेची खोटी देयके व त्यायोगे, कोणत्याही मालाची प्रत्यक्ष देवाणघेवाण न होता रू. 18.91 कोटी इतक्या रक्कमेचा बोगस Input Tax Credit प्राप्त करून घेतला.

अत्ताउल्हा मोहम्मद नईमचौधरी यांचे कृत्य हे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर कायदा 2017 च कलम 132 (1) (b) व (C)नुसार गुन्हा असून, कलम 132(1) (i) नुसार कमीतकमी 6 महिने, जास्तीत जास्त 5 वर्ष तुरूंगवास, आणि दंड- इतक्या शिक्षेस पात्र आहे. तसेच या कायदयाच्या कलम 132 (5) नुसार अपराध दखलप्राप्त व अजामिनपात्र आहे.त्यामुळे अत्ताउल्हामोहम्मद नईम चौधरी यांना मुंबई येथून अटक करण्यात आली आहे.

अतिरिक्त मुख्य महानगरदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने श्री. अत्ताउल्हा मोहम्मद नईम चौधरी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. महाराष्ट्र वस्तू वसेवाकर विभागाने करदात्यांस महाराष्ट्र वस्तू व सेवाकर कायद्यानुसार करभरणा व इतर बाबींची पूर्तता नियमितपणे करण्याबाबत आवाहन केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी 18 नोव्हेंबरपासून आवेदनपत्रे स्वीकारली जाणार; विद्यार्थ्यांनी ऑनलाईन आवेदनपत्र भरावीत

Wed Nov 17 , 2021
मुंबई, दि. 17- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षेची आवेदनपत्रे गुरूवार दि. 18 नोव्हेंबरपासून स्वीकारली जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरावीत, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे. परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार व तुरळक विषय, आयटीआय घेऊन प्रविष्ट […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com